शहरं
Join us  
Trending Stories
1
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
2
CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट
3
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
4
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
5
Latest Marathi News LIVE Updates: "धारावीकरांना हुसकावून लावण्यासाठी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त...", काँग्रेस खासदारांचा गंभीर आरोप
6
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
7
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
8
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
9
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
10
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
11
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
12
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
13
Vastu Shastra: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग एकदा भिंतीवरची चित्र बदलून पाहाच!
14
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
15
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
16
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
17
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
18
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
20
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना पीडितांची भूक भागवायला सरसावला सुहृदयी तरुण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:34 IST

चिखली : कोरोनामुळे उद्भवलेल्या सध्याच्या संकटकाळात प्रत्येकाने माणुसकी जपायला हवी, असा संदेश दिल्या जात आहे. याच माणुसकीच्या नात्याने सर्वांना ...

चिखली : कोरोनामुळे उद्भवलेल्या सध्याच्या संकटकाळात प्रत्येकाने माणुसकी जपायला हवी, असा संदेश दिल्या जात आहे. याच माणुसकीच्या नात्याने सर्वांना मदत करण्याची इच्छा बाळगून असलेल्या येथील सुहृदयी तरुण गजू तारू यांनी योग्य आपल्या 'जेएमडी परिवार' या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था नसलेल्या काेरोना बाधित रुग्ण व त्यांच्या संपूर्ण कुटुंबास घरपोच मोफत जेवण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत शहर व परिसरात दररोज सुमारे शंभरावर जेवणाचे डबे पुरविण्यात येत आहेत.

करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक लोकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यापूर्वी एखादी व्यक्ती आजारी पडल्यास त्या व्यक्तीला जेवणाचा डबा देण्यासाठी असंख्य नातेवाईक, मित्रपरिवार धावून जात असत. प्रामुख्याने दवाखान्यात भरती असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकाना डबा घेऊन येऊ का किंवा डबा घेऊन येतो, असे विचारणे व त्यांना डबा पोहविणे, प्रत्यक्ष भेटून आस्थेवाईकपणे चौकशी करणे. या बाबी सर्वसाधारणपणे घडत असत. मात्र, कोरोनाने या सर्व बाबीला आडकाठी आणली असल्याने माणुसकी विसरू नका, असा संदेश प्रामुख्याने सोशल मीडियावर फिरत आहे. मात्र, अशा वातावरणात गजानन तारू यांनी कोरोनापीडितांना घरगुती जेवणाचा डबा मोफत देण्याचा उपक्रम गेल्या आठवडाभरापासून सुरू केला आहे. ज्या घरात कोरोनाचे रुग्ण आहेत किंवा जे स्वत: बाधित आहेत आणि ज्यांची जेवणाची व्यवस्था होऊ शकत नाही, अशा नागरिकांना घरपोच जेवणाचे डबे पोचविण्याचे काम तारू आपल्या 'जय माता दी' परिवाराच्या माध्यमातून करीत आहेत. संकटकाळात कायम धावून जाणाऱ्या गजू तारू यांनी यांनी कठीण काळातदेखील मदतीचा योग्य मार्ग निवडून स्वखर्चातून ही सेवा पुरवित असल्याने त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गरजूंनी नि:संकोचपणे संपर्क साधावा !

गजू तारू आपल्या कुटुंबीयांच्या मदतीने घरीच सात्त्विक भोजन तयार करून करून घेत आहेत. एखाद्या व्यक्तीने फोन केल्यानंतर त्या व्यक्तीच्या घरी शे. यासीन व राहुल सुरडकर यांच्याव्दारे घरपोच डबा दिला जात आहे. याअंतर्गत दररोज सकाळ-संध्याकाळ सुमारे १०० डबे घरपोच पोहचविण्यात येत आहेत. दरम्यान, गरजूंनी नि:संकोचपणे संपर्क साधावा, असे आवाहन गजू तारू यांनी केले आहे.