Corona Cases in Buldhana : मंगळवारी दोघांचा मृत्यू, ९८ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 11:50 IST2021-06-09T11:49:56+5:302021-06-09T11:50:04+5:30
Corona Cases in Buldhana मंगळवारी दोन जणांचा मृत्यू झाला तर ९८ जण तपासणीत कोरोना बाधीत आढळून आले.

Corona Cases in Buldhana : मंगळवारी दोघांचा मृत्यू, ९८ जण पॉझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोनामुळे जिल्ह्यात मंगळवारी दोन जणांचा मृत्यू झाला तर ९८ जण तपासणीत कोरोना बाधीत आढळून आले. दरम्यान प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण ३ हजार ९६० जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३ हजार ८६२ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील २२, खामगावमधील १४, शेगाव ६, देऊळगाव राजा १, चिखली १५, मेहकर १२, नांदुरा २, लोणार ९, मोताळा ८, जळगाव जामोद ४, सि. राजा ३, संग्रामपूर २ याप्रमाणे ९८ जण कोरोना बाधित आढळून आले. मलकापूरमध्ये तपासणीत एकही जण कोरोना बाधित आढळून आला नाही. उपचारादरम्यान बुलडाणा तालुक्यातील चांडोळ येथील ६० वर्षीय महिला व मोताळा तालुक्यातील गुगळी येथील ७२ वर्षीय पुरुषचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दुसरीकडे मंगळवारी १२९ जणांनी कोरोनावर मात केली. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ५ लाख १० हजार ४०१ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. सोबतच ८४ हजार २४२ रुग्णांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली आहे. गेल्या आठ दिवसापासून बाधितांचे प्रमाण कमी होत असल्याचे चित्र आहे.