शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा बहुप्रतीक्षित विजय, नव्या पर्वाचा प्रारंभ

By admin | Updated: October 20, 2014 00:14 IST

बुलडाणा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ विजयी.

हर्षनंदन वाघ / बुलडाणायुती व आघाडी तुटल्यामुळे बदललेली राजकीय समीकरणे, मनसेची अनपेक्षित मुसंडी, त्या तच युवा व सर्वसामान्य जनतेने काँग्रेसच्या नव्या चेहर्‍याला दिलेली पसंती यामुळे बुलडाणा विधानसभा मतदारसंघात एका भल्या माणसाचा विजय झाला. या विजयामुळे सर्वसामान्यांना आपला विजय असल्याचे वाटत आहे. शिवाय नव्या पर्वाचा राजकारणात प्रारंभ झाला आहे.भाजप-सेना युतीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या बुलडाणा विधानसभा म तदारसंघावर युतीचे विजयराज शिंदे यांनी आपला दबदबा कायम ठेवला होता. मात्र, यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व भाजपा-सेना युती तुटल्यामुळे राजकीय समीकरणे बदलली. भाजपने वेळेवर काँग्रेसमधून उमेदवार आयात करून योगेंद्र गोडे यांना रिंगणात उ तरविले. दुसरीकडे शिवसेनेचे विजयराज शिंदे यांना आपल्या सैनिकांसोबत किल्ला लढविण्याचे ठरविले. आघाडी तुटल्यामुळे नरेश शेळके यांनीही ह्यघड्याळह्ण हातावर बांधत निवडणुक रिंगणात उडी घेतली व प्रचार सुरू केला. या सर्व प्रचारात मनसेचे संजय गायकवाड यांनी निवडणुकीपूर्वीच इंजिनचा ताबा घेतला होता. ही लढत अतिशय चुरशीची झाली. गायकवाड व सपकाळ यांनी धनशक्तीविरोधात लढा असल्याचे सांगत अ ितशय लो-प्रोफाइल प्रचार यंत्रणा राबविली. त्याचा फायदा या दोघांना झाला. काँग्रेसचा नवीन चेहरा व मनसेचा लोकांच्या सुखदुखात धावुन जाणारा उमेदवार या दोघांनाही लोकांनी उत्तम पसंती दिली. मात्र, यामध्ये सपकाळ यांनी बाजी मारली. विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे चार उमेदवार असल्यामुळे समीकरणे बदलली. तरीही प्रत्येक उमेदवार विविध दाखले देत समाजातील प्रत्येक घटक आपल्याला पाठिंबा देतील, असा दावा करीत होते. विजयराज शिंदे यांनी मतदारसंघात केलेली कामे विजयश्री खेचून आणेल, असा दावा केला होता. मात्र, त्यांच्या विरोधात असलेली सुप्त लाट व सेनेतच लागलेला सुरुंग यामुळे त्यांचा पराभव अटळ ठरला. भाजपाचे योगेंद्र गोडे यांना मिळालेल्या मतांमध्ये त्यांच्या प्रचार यंत्रणेसोबतच मोदींचा प्रभाव एवढेच कारण आहे. शेवटी युती-आघाडी तुटल्यामुळे झालेला परिणाम, मतांचे झालेले विभाजन यामुळे अंदाज काढणे कठीण झाले होते.