मोताळा नगर पंचायतवर काँग्रेसचा झेंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2022 12:07 IST2022-01-19T12:07:36+5:302022-01-19T12:07:44+5:30

Motala Nagar Panchayat Election : काँग्रेस १२, शिवसेना चार, राष्ट्रवादीचा एक उमेदवार विजयी झाला आहे.

Congress flag on Motala Nagar Panchayat | मोताळा नगर पंचायतवर काँग्रेसचा झेंड

मोताळा नगर पंचायतवर काँग्रेसचा झेंड

मोताळा: स्थानिक नगर पंचायतच्या १७ जागेसाठी ६४ उमेदवार रिंगणात होते. १८ जानेवारी रोजी मतदान पार पडले. दरम्यान, १९ जानेवारीला सकाळी नगरपंचायतचा निकाल घोषित झाला. यामध्ये मोताळा नगर पंचायतवर काँग्रेसचे एकहाती विजय मिळविला आहे.

मोताळा नगरपंचायतमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या प्रत्येकी चार राखीव जागा वगळता अन्य जागांसाठी २१ डिसेंबर रोजी शांततेत मतदान झाले होते. त्यानंतर चार जागांसाठी १८ जानेवारी रोजी मतदान पार पडले. मोताळा नगर पंचायतच्या निवडणूकीनंतर निकालाची उत्सुकता लागली होती. दरम्यान, १९ जानेवारीला सकाळी मतमोजणीला सुरूवात झाली. यामध्ये मोताळा नगर पंचायतीत काँग्रेस १२, शिवसेना चार, राष्ट्रवादीचा एक उमेदवार विजयी झाला आहे.

Web Title: Congress flag on Motala Nagar Panchayat