शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

बहुरंगी लढतीत प्रतिष्ठेची टक्कर

By admin | Updated: September 28, 2014 00:24 IST

चिखली विधानसभा मतदारसंघात बहुरंगी लढतीचे चित्र.

सुधीर चेके पाटील / चिखलीगत पंधरा दिवसांपासूनचे युती, आघाडीचे चर्चेचे गुर्‍हाळ ह्यनवरा मेला तरी चालेल; पण सवत विधवा झाली पाहिजेह्ण या प्रवृत्तीतून सुरू होते. ते गुरुवारी संपल्याने चिखली विधानसभा मतदारसंघात बहुरंगी लढतीचे चित्र उभे राहिले आहे.चिखली मतदारसंघाकडे ह्यपॉलिटिकल हबह्ण म्हणूनच पाहिल्या जाते. अनेक मोठय़ा राजकारण्यांना राजकारणाचे धडे या मतदारसंघाने घालून दिले आहेत. हा मतदारसंघ परिवर्तन तत्काळ स्वीकारतो. नवख्यांना अलगद कवेत घेतो, तर जुन्यांना हलकेच बाजूला सारतो. तर कधी जुन्यांना झळाळी देतो. असेच काहीसे जुने चित्र परत या मतदारसंघात नव्या पिढीला एका तपानंतर पाहावयास मिळत आहे.युती, आघाडी तुटल्याने दोन दांडावरून न वाहणारे पाणी आता चार दांडातून वाहताना दिसू लागल्याने मतदार राजा नव्या परिवर्तनाच्या आशेने सुखावला आहे. पूर्वी युतीच्या माध्यमातून भाजप-शिवसेनेचा एकच उमेदवार असायचा. आता भाजपाचे सुरेश खबुतरे व शिवसेनेचे डॉ. प्रताप राजपूत तसेच आघाडीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा एकच उमेदवार असायचा आता काँग्रेसचे विद्यमान आमदार राहुल बोंद्रे, तर राष्ट्रवादीकडून माजी आमदार धृपतराव सावळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. याशिवाय मनसेकडून विनोद खरपास, भारिप बमसंकडून विजय खरात, इमरान खान उमरखान, राजेश गवई, जालींधर बुधवत, श्रीराम सपकाळ, दत्ता संतोषराव गवळी, एकनाथ जाधव, देविदास जाधव, पद्मनाथ बाहेकर, देवानंद गवई, दत्ता खरात, नवृत्ती जाधव, प्रदीप अंभोरे, दगडू साळवे, गणेश बाहेकर, मो. तौफिक मो. हाफिज, सविता बाहेकर, प्रमोद पाटील, विशाल भंडारे, विलास शेगावकर, तुषार गुजर आणि अयाज अहेमद हबीब अहेमद कुरेशी अशा एकूण २७ उमेदवारांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत. गत आठवड्यापूर्वी एकमेकांच्या गळ्यात गळा घालून ऊर फाटेस्तोवर गुणगाण करणारे आता परस् परांवर कशी चिखलफेक करतात, हे पाहणे मोठे रंजक होणार आहे. परिणामी एकमेकांचे गुणगाण करणारे आता उणेदुणे काढताना दिसणार, यात शंका नाही. सोबतच या बहुरंगी निवडणुकीमुळे उमेदवारांची संख्या वाढली आहे त्यामुळे मतदारांचेही भाव चांगलेच वधारले असून, गावपुढार्‍यांसाठी खर्‍या अर्थाने सुगीचे दिवस आल्याचे दिसून येत आहे. ही लढत उमेदवारांसाठी अतिशय प्रतिष्ठेची झाली असून, जातीय समीकरणांचीही गणिते मांडली जात असल्याचे चित्र आहे.