शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
4
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
5
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
6
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
7
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
8
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
9
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
10
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
11
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
12
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
13
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
14
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
15
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
16
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
17
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
18
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
19
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
20
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...

स्वच्छता अँप डाउनलोडिंगमध्ये खामगावची बाजी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 2:22 AM

खामगाव:  खामगाव नगरपालिकेने स्वच्छ अँप डाउनलोडिंगचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. त्यामुळे  स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेद्वारे होत असलेल्या जाणीव जागृतीचे सकारात्मक परिणाम खामगावकरांवर झाल्याचे दिसून येते. अवघ्या महिनाभरात पालिकेने उद्दिष्ट साध्य केल्याने, स्वच्छ सर्वेक्षणात पालिकेच्या सरशीचा मार्ग मोकळा झाल्याचे संकेत आहेत.  

ठळक मुद्देखामगाव पालिकेचे अँप डाउनलोडिंगचे उद्दिष्ट पूर्ण

अनिल गवई। लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव:  खामगाव नगरपालिकेने स्वच्छ अँप डाउनलोडिंगचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. त्यामुळे  स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेद्वारे होत असलेल्या जाणीव जागृतीचे सकारात्मक परिणाम खामगावकरांवर झाल्याचे दिसून येते. अवघ्या महिनाभरात पालिकेने उद्दिष्ट साध्य केल्याने, स्वच्छ सर्वेक्षणात पालिकेच्या सरशीचा मार्ग मोकळा झाल्याचे संकेत आहेत.  स्वच्छ भारत अभियानाच्या धरतीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत राज्यातील विविध शहरांमध्ये ‘स्वच्छ सर्वेक्षण’ मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या सहभागामुळे या सर्वेक्षण महत्त्वाचे मानले जात असतानाच, नागरिकांचा ‘फिडबॅक’ हा या सर्वेक्षणाचा महत्त्वपूर्ण घटक बनला असून, पालिका प्रशासनाकडून नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादासाठी प्रयत्न केले जात आहेत. विविध उपाययोजनाही पालिका प्रशासनाकडून केल्या जाताहेत.  यामध्ये स्वच्छता अँप डाउनलोडिंग सोबतच जनजागृतीचाही समावेश असून, भावनात्मक प्रतिसादासाठी ‘स्वच्छता भूत’ अधोरेखित करण्यात आले. या जाणीव जागृतीचा सकारात्मक परिणाम खामगावकरांवर झाला असून, स्वच्छता अँप डाउनलोडिंगमध्ये पालिकेने अपेक्षित उद्दिष्ट पूर्ण केले आहे. निर्धारित उद्दिष्टापेक्षाही अधिक उद्दिष्ट गाठण्यासाठी पालिकेची वाटचाल सुरू आहे.

तात्काळ तक्रारीसाठी ‘अँप’ची सुविधा!शहर स्वच्छतेसाठी नगरपालिका प्रशासनाने पाऊले उचलली आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून स्वच्छता कशी करात येईल, याबाबत प्रयत्न केले जात आहेत. स्वच्छ सर्वेक्षण २0१८ मध्ये देशातील शहरांनी सहभाग नोंदविला आहे. यामध्ये खामगाव शहर ४१५ व्या स्थानी असून, शहर स्वच्छतेसाठी पालिका प्रशासनासोबतच पालिका पदाधिकार्‍यांनी पुढाकार घेतला आहे.  याचाच एक भाग म्हणून ‘स्वच्छता अँप’ सुरू करण्यात आले आहे. या अँपद्वारे आपल्या परिसरातील तक्रारी पालिकेपर्यंत पोहचविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

निर्धारित उद्दिष्ट पूर्ण!खामगाव शहरासाठी सुरुवातीला अँप डाउनलोडिंगसाठी १,८३६ उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले; मात्र प्रत्यक्षात १६ फेब्रुवारीपर्यंत १,८९0 जणांनी मोबाइल अँप डाउनलोड केले आहे. यामध्ये १,८७८ अँड्रॉइड मोबाइलधारक असून, १२ जणांकडे (आयओएस) सिस्टीम मोबाइलधारक आहेत. अद्यापपर्यंत एकाही सिटी अँपधारकाने स्वच्छता अँप डाउनलोड केले नसल्याचे दिसून येते.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानkhamgaonखामगाव