तरोडा येथे दोन गटात हाणामारी

By Admin | Updated: October 4, 2016 01:54 IST2016-10-04T01:54:37+5:302016-10-04T01:54:37+5:30

जनावर चोरीच्या संशयावरुन दोन गटात हाणामारी झाल्याची घटना खामगाव तालुक्यातील तरोडा कसबा येथे रविवारी घडली.

Clashes in two groups at Taroda | तरोडा येथे दोन गटात हाणामारी

तरोडा येथे दोन गटात हाणामारी

खामगाव(जि. बुलडाणा), दि. ३- जनावर चोरीच्या संशयावरुन दोन गटात हाणामारी झाल्याची घटना तरोडा कसबा येथे रविवारी घडली. परस्पर विरोधी तक्रारीवरुन खामगाव ग्रामीण पोलिसांनी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या तरोडा कसबा येथील भिका सुधाकर तेलगोटे यांनी पोलिसात तक्रार दिली की, त्यांना जनावर चोरुन नेतोस, या कारणावरुन आकाश भाऊराव वानखडे, सुनीता सरकटे, भाऊराव वानखडे व कविता यांनी लोखंडी पाइप मारुन जखमी केले. या तक्रारीवरुन पोलिसांनी उपरोक्त चार आरोपीविरुद्ध कलम ३२४, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला, तर सुशीला दिलीप तेलगोटे यांनी पोलिसांना तक्रार दिली की, तिचे पतीस गावातीलच भिका सुधाकर तेलगोटे, मनोज निंबाळकर, रत्नाबाई विलास हिवराळे, शांताबाई सुधाकर तेलगोटे, पंकज संजय तेलगोटे, सुधाकर तेलगोटे व चेतन यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याच्या कारणावरुन मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरुन पोलिसांनी उपरोक्त आरोपीविरुद्ध कलम १४७,१४९,३२४,४५२,५0४, ५0६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Web Title: Clashes in two groups at Taroda