शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

दोन चिमुकल्यांसह चिंचोले कुटुंबियांचे उपोषण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 6:07 PM

अनिल साहेबराव चिंचोले यांनी २५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या कुटुंबासह उपोषण सुरु केले आहे.

बुलडाणा: किन्होळा येथील सरपंच व सचिव हे मनमानी पद्धतीने कामकाज करीत असून विविध योजनांमध्ये अपहार केला जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी अनिल साहेबराव चिंचोले यांनी २५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या कुटुंबासह उपोषण सुरु केले आहे.किन्होळा येथील सरपंच बाहेकर, ग्रामविकास अधिकारी रामेश्वर मुंडे, उपसरपंच शेख अशफाक, गटविकास अधिकारी भुजबळ, मंडळ अधिकारी गायकवाड, तलाठी सुनील टेकाळे, नायब तहसीलदार कानडजे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी ३० नोव्हेबर २०१८ रोजी दुपारी अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली चिंचोले यांच्या राहत्या घराचे नुकसान केले. कोणतीची पूर्व सूचना न देता राजकीय द्वेषापोटी राहते घर तोडून पत्नी व दोन मुलांना रस्त्यावर आणले. विशेष म्हणजे संपूर्ण गावात केवळ एकाच ठिकाणी अतिक्रमण काढण्याची ही कारवाई करण्यात आली.  निवासी जागेवरील अतिक्रमण हटवून त्यानंतर शेतीसाठी ही जागा दुसºयाच्या ताब्यात देऊन त्यावर अतिक्रमण करण्यात आले. ग्रामपंचायत प्रशासनाने केलेल्या या अन्यायाबाबत कारवाई करुन नुकसान भरपाई द्यावी तसेच निवाºयासाठी जागा द्यावी, २०१७ मध्ये पाणी नसलेली विहिरी अधिग्रहीत केल्याचे दाखवून शासनाची दिशाभूल करुन पैसे काढण्यात आले, याबाबत देखील चौकशी करावी व गावातील रहदारीस अडथळा निर्माण करणारे सर्व अतिक्रमण हटविण्यात यावे, या मागणीसाठी २३ फेब्रुवारी रोजी अनिल साहेबराव चिंचोले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटुंब उपोषण सुरु केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagitationआंदोलन