शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

चिखलीत पेट्रोल पंपचालकास दहा हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 11:10 IST

Chikhli News : महसूल व नगरपालिका प्रशासनाने दहा हजारांचा दंड वसूल करून चांगलाच दणका दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : जिल्ह्यात घोषित दहा दिवसांच्या निर्बंध दरम्यान अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी सोडून खासगी वाहनांना पेट्रोल, डिझेल न देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. मात्र असे असतानाही शहरातील एका पेट्रोल चालकांकडून नियमांचा उल्लंघन केले जात असल्याचे लक्षात येताच महसूल व नगरपालिका प्रशासनाने दहा हजारांचा दंड वसूल करून चांगलाच दणका दिला आहे. काेराेना संक्रमण राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत़  या काळात सुरूवातीला अत्यावश्यक सेवा आणि माध्यम प्रतिनिधींनाच पेट्रोल, डिझेल देण्याबाबत आदेशित केले होते. दरम्यान ११ मे रोजी सुधारित आदेशानुसार शेतकऱ्यांना शेतातील मशागतीची कामे करण्यासाठी व शेतमालाच्या वाहतुकीसाठी ट्रॅक्टर आणि वकिलांना देखील इंधन देण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. असे असताना येथील रेणुका पेट्रोल पंपावर  खासगी वाहनांना सर्रासपणे पेट्रोल, डिझेल दिले जात होते. तथापि यामुळे पेट्रोल पंपावर मोठी गर्दी उसळली होती. याबाबत माहिती मिळताच नगरपालिका व महसूलच्या पथकाने पेट्रोल पंपावर धाव घेऊन पेट्रोल पंपधारकास याबाबत विचारणा केली असता त्यांनी पथकासोबत हुज्जत घातली. याठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती  तहसीलदार अजितकुमार येळे यांना देण्यात आली. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यावरून पंपावर प्रचंड गर्दी व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १२ मे रोजी नगरपालिकेने पेट्रोल पंप चालकांना १० हजार रूपयांची दंडात्मक कारवाई केली. ही कारवाई नायब तहसीलदार वीर, तलाठी गिरी, भुसारी यांच्यासह नगरपालिकेचे फिरते पथक पथक प्रमुख आत्माराम इंगळे, राजेंद्र रावे, फकिरा शिंगणे, राजू देशमुख, सुभाष दांडगे यांनी केली.  

टॅग्स :ChikhliचिखलीbuldhanaबुलडाणाPetrol Pumpपेट्रोल पंप