शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ स्वस्त धान्य दुकानदाराला अटक

By admin | Updated: December 9, 2014 00:00 IST

स्वस्त धान्य दुकानदारावर अन्न व पुरवठा जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल.

लोणार (बुलडाणा): स्वस्त धान्याची काळ्या बाजारात विक्री केल्यानंतर तहसीलदारांच्या तक्रारीवरून पहुर येथील स्वस्त धान्य दुकानदारावर अन्न व पुरवठा जीवनावश्यक वस्तू कायद्यां तर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी दाखल अर्ज न्यायालयाने खारीज केल्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार मुंढे यांनी सोमवार, ८ डिसेंबरला पोलीस ठाण्यात स्व त:ला अटक करून घेतली. स्थानिक शासकीय गोदामातून पहूर येथील स्वस्त धान्य दुकानदार आर. एस. मुंढे यांनी ११ नोव्हेंबर रोजी रेशनचे २५ क्विंटल गहू, १९ क्विंटल तांदूळ व २ क्विंटल साखर असा एकूण ४६ क्विंटल धान्यमाल एम.एच.0४ ए.जी.८४ क्रमांकाच्या ४0७ वाहनात वाटपासाठी उचल केला होता. सदर धान्य गावात न नेता, त्यांनी या धान्याची काळ्याबाजारात विक्री करून शासकीय धान्याची अफरातफर केली. घटनेची माहिती कळताच जिल्हा पुरवठा अधिकारी भराडी आणि पुरवठा निरीक्षक पिंपरकर यांनी पहुर येथे जाऊन मुंढे यांच्या दुकानाची पाहणी केली. त्यामध्ये त्यांना वाटपासाठी उचल केलेले धान्य आढळून न आल्याने तसेच गावात केलेल्या चौकशीच्या आधारे स्वस्त धान्याची अफरातफर झाल्याचे निदर्शनास आले. यावेळी कारवाईच्या भीतीपोटी सदर स्वस्त धान्य दुकानदार फरार झाला होता. जिल्हा पुरवठा अधिकारी भराडी यांनी तहसीलदार अपार यांना सदर दुकानदारावर अन्नपुरवठा जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर तहसीलदार अपार यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून स्वस्त धान्य दुकानदार मुंढे यांच्यावर कलम ३, ७ इ.सी.अँक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात सादर केलेला अर्ज मंजूर न झाल्यामुळे घटनेच्या तब्बल २८ दिवसानंतर स्वस्त धान्य दुकानदार हे स्व त:हून पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि स्वत:ला अटक करून घेतली.