Chanting of 'Gan, Gan, Gante Bote' in Sindkhed Raja | मातृतीर्थात घुमला ‘गण, गण, गणात बोते’चा गजर
मातृतीर्थात घुमला ‘गण, गण, गणात बोते’चा गजर

काशिनाथ मेहेत्रे  
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेड राजा : ‘गण गण गणात बोते’च्या गजर करत वारकरी श्री क्षेत्र शेगाव येथुन आषाढी एकादशी निमीत्त पंढरपुर येथे गेलेल्या संत गजानन महाराजांची पालखीचे परतीचे मार्गाने असून २९ जुलै रोजी दुपारी श्रींच्या पालखीचे सिंदखेड राजा येथे आगमण झाले. विर्दभ-मराठवाडा सरहद्दीवर भाविकांनी श्रींच्या पालखीचे स्वागत केले. भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
यावेळी फटाक्याची अतिशबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली. गण गण गणात बोते चा जयघोष करीत दिडींतील वारकऱ्यानी जल्लोष केला. शेगाव येथुन आषाढी वारी साठी २९ जुन रोजी पंढरपुर साठी निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे हे ५२ वे वर्ष आहे. दिंडीमध्ये सुमारे साडेसहाशे वारकरी पायदळ वारी करत साडेसातशे किलोमिटरचा प्रवास करत सहा जिल्ह्यांमधुन पंढरपुर येथे पोहचले. सहा दिवसाच्या मुक्कामानंतर पंढरपुरवरुन शेगावकडे पालखी मार्गस्थ झाली. जालना येथे दोन दिवसाच्या मुक्कामनंतर २९ जुलै रोजी नाव्हा मार्गे विर्दभ मराठवाड्याच्या सिमेवर दुपारी दोन वाजता पालखी पोहचली. यावेळी स्व: जिल्ह्यात पोहचल्याच्या आनंद पायदळी चालणाºया वारकऱ्यांच्या मनात मावेनासा झाला होता. मृदंग व टाळाचे ठेका धरत वारकरी संत गजानन महाराजांचा जयघोष करत आनंदाने नाचत होते. गण गण गणात बोतेच्या गजरासह विठ्ठलाचे भजन करीत होते. पालखी विदर्भ मराठवाडा सरहदीवर पोहचताच या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने मोठे स्वागतव्दार उभारण्यात आले होते. यावेळी नगर परिषदेच्या वतीने पालखीचे पूजन करुन स्वागत करण्यात आले. आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, नगराध्यक्ष सतीश तायडे सपत्नीक, नंदाताई विष्णु मेहेत्रे सपत्नीक, छगनराव मेहेत्रे, जगनराव ठाकरे, गणेश झोरे, कैलास मेहेत्रे, विजय तायडे, नरहरी तायडे यांनी दर्शन घेतले. त्यांनतर पालखी सिंदखेड राजा शहरात दाखल झाली. यावेळी पोलीसांचा चोख बंदोबस्त आहे. पालखीचा विदर्भामध्ये प्रवेश झाल्यानंतर माळ सावरगाव, तुळजापूर, नशिराबाद, फाट्यावर गावकºयांच्या वतीने वारकºयांना चहा, नास्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.


वारकºयांसाठी चहा पाण्याची व्यवस्था
नशिराबाद फाट्यावर अंचली, डावरगाव, धांदरवाडी, शेलु, भोसा येथील भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. जिजाऊ सृष्टी, संत भगवान बाबा महाविद्यालय, टी पाँईट, पोलीस स्टेशन, तहसिल कार्यालय, पंचायत समीती यांच्या वतीने चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सरहद्दीवर दिंडी येण्यापुर्वीच वरुन राजाने सुध्दा हजेरी लावली होती.


सिंदखेड राजात मुक्काम
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रामेश्वर मंदीरामध्ये रामेश्वर समीतीच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर जिजामाता विद्यालयाचे अध्यक्ष बाळाजी तायडे व प्राचाय सुरेश तायडे यांचे वतीने पालखीसह दिंडीच्या मुक्कामाचे चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आले होते. त्या ठीकाणी प्रथम श्रींची आरती ९ वाजता व श्रीहरी कीर्तन झाले. शहरासह परिसरातील भाविक भक्तांनी लाभ सिंदखेड राजा येथे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.


बिबी येथे आजचा मुक्काम
३० जुलै रोजी सकाळी ३ वाजेपासुन श्री महाराजांचा अभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर दिंडी किनगाव राजाकडे रवाना होईल. ३० जुलै रोजीचा मुक्काम बिबी येथे आहे. तर ३१ जुलै लोणार, १ आॅगस्ट रोजी मेहकर, २ आॅगस्ट रोजी जानेफळ, ३ आॅगस्टला शिर्ला नेमाने, ४ आॅगस्टला, खामगाव आणि ६ आॅगस्टला शेगाव येथे पोहचणार आहे.

Web Title: Chanting of 'Gan, Gan, Gante Bote' in Sindkhed Raja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.