शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

सातासमुद्रापल्याड ‘गण गण गणात बोते’चा जयघोष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2020 10:19 AM

इंग्लड, अमेरिका, आॅस्ट्रेलिया, कॅनडा या देशातही महाराजांच्या भक्तवर्गांकडून साजरा करण्यात आला.

- ब्रह्मानंद जाधव

बुलडाणा : गुरूपुष्यामृत योगावर झुणका भाकर महानैवेद्य अर्पण सोहळा व गजानन विजय ग्रंथाचे पारायण लॉकडाउनमुळे घरोघरी करण्यात आले. हा सोहळा महाराष्ट्रातच नव्हे तर इंग्लड, अमेरिका, आॅस्ट्रेलिया, कॅनडा या देशातही महाराजांच्या भक्तवर्गांकडून साजरा करण्यात आला. सातासमुद्रापल्याड ‘गण गण गणात बोते’चा जयघोष  झाला. सोहळ्यात सहभागी भक्तांची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत सव्वा दोन लाख भाविकांनी सहभाग घेतल्याची नोंद आहे.   विदर्भाची पंढरी शेगाव येथील श्री गजानन महाराज यांचा भक्तवर्ग देश विदेशात आहे. गजानन महाराजांचा कुठलाही उत्सव हा महाराष्ट्रपुरता मर्यादीत राहत नाही;  तो विदेशातही थाटामाटात साजरा होतो. अध्यात्म क्षेत्रात गुरूपुष्यामृत योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरूवार, ३० एप्रिल रोजी गुरूपुष्यामृत योग होता. त्यानिमित्त श्री संत गजानन महाराजांच्या भक्तांनी ‘झुणका भाकर महानैवेद्य’ अर्पण सोहळा साजरा करण्याचा संकल्प केला होता. या लॉकडाउनमध्ये श्रींचा हा सोहळा प्रत्येकाने घरात साजरा करून त्याची समितीकडे नोंद करण्याचे नियोजन गेल्या काही दिवसांपासून केले होते. श्री गजानन महाराज यांना गुरूपुष्य योगावर ‘श्री गजानन विजय गं्रथ’ अध्याय १६ वामध्ये महाराजांचे परम भक्त भाऊ कवर यांनी जसा नैवेद्य अर्पण केला त्याचप्रमाणे भक्तांनी ‘झुणका भाकर’ महानैवेद्य अर्पण करून श्रींचे पारायण केले. याच मुहूर्ताचे औचित्य साधुन लॉकडाऊनच्या कारणास्तव सर्व भक्तांनी आपापल्या घरीच एक दिवसाचे पारायण व ३ भाकरी, झुणका (पिठल्ल), कांदा, ठेचा असा नेवेद्य महाराजांना अर्पण केला. महाराष्ट्रसह विदेशातही हा उत्सव साजरा करण्यात आला. 

याठिकाणी झाला उत्सवझुणका भाकर महानैवेद्य व पारायणाचा हा उपक्रम महाराष्ट्र, भंडारा, गोंदिया, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, रत्नागिरी, सावंतवाडी या सर्व भागात झाला. गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, पंजाब, दिल्लीसह विदेशातील अमेरीका (कॅलिफोर्निया), कॅनडा, अल्ट्राँटिका प्रदेश, इंग्लंड, आॅस्ट्रेलिया, सिंगापूर, या देशातून श्री संत गजानन महराजांना महानैवेद्य अर्पण सोहळ्यात भाविकांनी सहभाग घेतला.

नोंद घेण्याची प्रक्रिया सुरूचया उपक्रमात सहभागी झाल्याची नोंद समितीकडे घेण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे अजुनही उत्सव साजरा केलेल्या भक्तांची संख्या वाढणार असल्याची माहिती संयोजकांकडून देण्यात आली.

टॅग्स :ShegaonशेगावGajanan Maharajगजानन महाराजbuldhanaबुलडाणा