शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

वीज उपकेंद्र तोडफोडप्रकरणी गुन्हा दाखल

By admin | Updated: October 10, 2014 22:57 IST

मातोळा येथील वीज उपकेंद्र तोडफोडप्रकरणी सात शेतक-यांविरूद्ध गुन्हा दाखल.

मोताळा (बुलडाणा) : मलकापूर मार्गावरील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रामध्ये तोडफोड करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी खरबडी येथील सात शेतकर्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. ही तोडफोड ८ ऑक्टोबर रोजी झाली होती.खरबडी परिसरातील शेतकरी रोहित्रावरून होत असलेल्या कमी दाबाच्या वीजपुरवठय़ाने त्रस्त झाले आहेत. विहिरींना भरपूर पाणी आहे. मात्र, नवीन रोहित्राअभावी शेतकरी पिकांना पाणी देऊ शकत नाहीत. त्यांना डोळ्यांदेखत पिकांची हानी पाहावी लागत आहे. महावितरणला अनेकदा तक्रारी देऊनही दुरुस्ती झाली नाही. कर्मचार्‍यांच्या अशा अडेलतट्टू धोरणाला कंटाळलेल्या खरबडी येथील शेतकर्‍यांनी ८ ऑक्टोबर रोजी आपला उद्रेक व्यक्त केला. संतप्त शेतकर्‍यांनी सकाळी मलकापूर रोडवरील महावितरण उपकेंद्रावर धडक दिली. यावेळी कर्मचार्‍यांच्या उत्तराने शेतकर्‍यांचे समाधान न झाल्याने कार्यालयाची तोडफोडही करण्यात आली.

*आश्‍वासन न पाळल्याने शेतकरी संतप्तदोन नवीन डी.पी.ची मागणी पूर्ण करण्यात आली नाही. कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्यामुळे शेतकर्‍यांनी अनेकदा निवेदने दिली. त्यांची दखल घेण्यात आली नसल्याने शेतकर्‍यांचा संताप उफाळला. त्यांनी महावितरणच्या कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली.