बसस्थानकावरून वाहकाची बॅग लंपास
By Admin | Updated: June 29, 2016 00:47 IST2016-06-29T00:47:18+5:302016-06-29T00:47:18+5:30
खामगाव बस स्थानकावरील घटना.
_ns.jpg)
बसस्थानकावरून वाहकाची बॅग लंपास
खामगाव : नांदेड- मलकापूर बसवाहकाची बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना मंगळवारी दुपारी २.३0 वाजेदरम्यान येथील बसस्थानकावर घडली. नांदेड येथून मलकापुरकडे जाणारी मलकापूर डेपोची बस क्रमांक एमएच४0-क्यु ६१७९ ही मंगळवारी दुपारी बसस्थानकात प्लॅटफॉर्मवर उभी होती. यावेळी बसचे वाहक जी.एन. सैय्यद हे नियंत्रण कक्षाकडे नोंदणी करण्यासाठी गेले होते. या संधीचा फायदा घेवून अज्ञात चोरट्याने बसमधील त्यांची बॅग लंपास केली. बॅगमध्ये अंदाजे ३ ते ४ हजार रूपये व कपडे असल्याची माहिती वाहक जी.एन.सैय्यद यांच्याकडून मिळाली आहे.