लोणार ते बीड जाणारी बस उलटली

By Admin | Updated: August 14, 2015 00:25 IST2015-08-14T00:25:34+5:302015-08-14T00:25:34+5:30

मेहकर - औरंगाबाद महामार्गावरील अंजनी खुर्दनजीक अपघात; जीवित हानी नाही.

The bus from Lonar to Beed was canceled | लोणार ते बीड जाणारी बस उलटली

लोणार ते बीड जाणारी बस उलटली

अंजनीखुर्द (जि. बुलडाणा) : लोणार येथून बीडला जाणारी एस.टी महामंडळाच्या बस मेहकर - औरंगाबाद महामार्गावरील अंजनी खुर्दनजीक उलटल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी सकाळी ८.१५ वाजता घडली. सुदैवाने या अपघातात कोठलिही जीवित हानी झाली नाही. लोणार येथून एम.एच.१४ बी.टी.0६५४ क्रमांकाची एसटी बस २७ प्रवासी घेऊन बीडला जाण्यासाठी सकाळच्या सुमारास निघली. या एसटी बसवर चालक विश्‍वास जाधव व व वाहक म्हणून शिवाजी सिरसाट हे होते. दरम्यान, बस अंजनी खुर्द गावानजीक १ किमी अंतरावर आली असता समोरुन भरधाव वेगात येणार्‍या मोटारसायकलला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस रोडच्या खाली घसरुन उलटली.

Web Title: The bus from Lonar to Beed was canceled