बसची दुचाकीला धडक; एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 01:23 AM2017-10-16T01:23:03+5:302017-10-16T01:24:05+5:30

मोताळा : भरधाव एसटी बस रस्त्याच्या बाजूला उभ्या  असलेल्या दुचाकीवर आदळून एक जण जखमी झाल्याची  घटना रविवार, १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.४५ वाजता  बुलडाणा-मलकापूर मार्गावरील खैरखेड फाट्यानजीक घडली.

Bus biker hit; One injured | बसची दुचाकीला धडक; एक जखमी

बसची दुचाकीला धडक; एक जखमी

Next
ठळक मुद्देबुलडाणा-मलकापूर मार्गावरील खैरखेड फाट्याजवळ घडली  घटनासंतप्त गावकर्‍यांनी केला ‘रास्ता रोको’चा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा : भरधाव एसटी बस रस्त्याच्या बाजूला उभ्या  असलेल्या दुचाकीवर आदळून एक जण जखमी झाल्याची  घटना रविवार, १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.४५ वाजता  बुलडाणा-मलकापूर मार्गावरील खैरखेड फाट्यानजीक घडली.  दरम्यान, अपघातांच्या घटनांनी संतप्त झालेल्या गावकर्‍यांनी ग ितरोधकाची मागणी करीत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला.  दरम्यान, पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर  नियंत्रण मिळविले.
याबाबत भिका रामधन घोती रा. खैरखेड यांनी बोराखेडी पोलीस  स्टेशनला फिर्याद दिली, की फिर्यादीने रविवारी दुचाकी क्रमांक  एमएच २८ एएन ५८५३ खैरखेड फाट्यानजीक रस्त्याच्या  बाजूला थांबवली होती. दरम्यान, वसंतदास मोहन पडवाल हा  दुचाकीजवळ उभा असताना,  मलकापूरकडून बुलडाण्याकडे  जात असलेली एसटी एमएच ४0 एन ८0९७ चालक श्रीकृष्ण  काटे याने बस भरधाव व निष्काळजीपणे चालवून त्यांच्या  दुचाकीला धडक दिली. या अपघातात वसंतदास पडवाल  जखमी झाला व दुचाकीचे ८000 रुपयांचे नुकसान झाल्याचे  तक्रारीत नमूद आहे. 
अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी  संबंधित यंत्रणेकडून त त्काळ गतिरोधक बसविण्यात यावे, या मागणीसाठी गोर  सेनेच्यावतीने  १३ ऑक्टोबर रोजी मोताळा उपविभागीय  अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. या अपघातामुळे सं तप्त गावकर्‍यांनी गतिरोधकाची मागणी करीत रास्ता रोको  करण्याचा प्रयत्न केला व सार्वजनिक बांधकाम विभागाप्रती रोष  व्यक्त केला. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी बी.बी.  महामुनी, धामणगाव बढेचे ठाणेदार दीपक वळवी, बोरखेडीचे  दुय्यम ठाणेदार कडे खान पठाण, एएसआय गजानन वाघ,  रामविजय राजपूत, मिलिंद सोनोने, नरेश रेड्डी, वाहतूक शाखेचे  कचरे, खेडेकर यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर  नियंत्रण मिळविले. 

Web Title: Bus biker hit; One injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात