धाड- चिखली मार्गावर 'बर्निंग कार' चा थरार; चालक जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 16:20 IST2018-08-03T16:19:06+5:302018-08-03T16:20:18+5:30

पिंपळगाव सराई : बुलडाणा जिल्ह्यातील धाड- चिखली मार्गावर माळशेंबा गावानजीक धावत्या कारने  दोन आॅगस्ट रोजी मध्यरात्री अचानक पेट घेतल्याने चालक गंभीर जखमी झाला.

'burning car' on Dhad-Chikhali road; Driver injured | धाड- चिखली मार्गावर 'बर्निंग कार' चा थरार; चालक जखमी 

धाड- चिखली मार्गावर 'बर्निंग कार' चा थरार; चालक जखमी 

ठळक मुद्देगणपत वाघ असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते चिखली येथील रहिवाशी आहेत. पिंपळगाव सराई येथील चौफुली ते माळशेंबा दरम्यान त्यांच्या गाडीने अचानक पेट घतेला. गाडीला आग नेमकी कशी व कोणत्या कारणाने लागली ही बाब अद्याप अस्पष्ट आहे.

 

पिंपळगाव सराई : बुलडाणा जिल्ह्यातील धाड- चिखली मार्गावर माळशेंबा गावानजीक धावत्या कारने  दोन आॅगस्ट रोजी मध्यरात्री अचानक पेट घेतल्याने चालक गंभीर जखमी झाला. गणपत वाघ असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते चिखली येथील रहिवाशी आहेत. त्यांचे नातेवाईक आजारी असल्याने ते पत्नी व मुलाला चिखली तालुक्यातील चांडोळ येथे सोडण्यासाठी गेले होते. दरम्यान, दोन आॅगस्टला मध्यरात्री ते माळशेंबा मार्गे चिखलीला परत जात होते. दरम्यान, पिंपळगाव सराई येथील चौफुली ते माळशेंबा दरम्यान त्यांच्या गाडीने अचानक पेट घतेला. गाडी नियंत्रीत करून ते गाडीतून बाहेर पडले. यात ते जखमी झाले आहेत. गाडीला आग नेमकी कशी व कोणत्या कारणाने लागली ही बाब अद्याप अस्पष्ट आहे. सध्या गणपत वाघ यांच्यावर चिखली येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच रायपूरचे ठाणेदार प्रशांत सपकाळे व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळ गाठले व परिस्थितीची माहिती घेतली. या दुर्घटनेप्रकरणी गणपत वाघ यांनी रायपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. घटनेचा पुढील तपास रायपूर पोलिस करीत आहेत.

Web Title: 'burning car' on Dhad-Chikhali road; Driver injured