शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

बुलडाण्याचा पारा १५.४ अंश सेल्सिअसवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 14:57 IST

११ डिसेंबरला १६.६ अंश सेल्सिअसच्या आसपास असणारे हे तापमान १२ आणि १५ डिसेंबरचा अपवाद वगळता सातत्याने कमी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: थंडीचा कडाका यंदाही बुलडाणेकरांचे जनजीवन विस्कळीत करण्याची शक्यता असून यंदाच्या हिवाळ््यातील निच्चांकी असे १५.४ अंश सेल्सिअस तापमान १७ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता नोंदविल्या गेले. दरम्यान गेल्या आठ दिवसापासून बुलडाण्याचे तापमान सातत्याने घसरत असून गत वर्षी २९ डिसेंबर रोजी नोंदविल्या गेल्या निच्चांकी ७.८ अंश सेल्सिअसपर्यंत येत्या काळात हे तापमान पोहोचते की काय?, अशी भीती व्यक्त होत आहे.दरम्यान अद्याप जिल्ह्यात रब्बीची अपेक्षीत अशी पेरणी झालेली नसली तरी जी काही पेरणी झाली आहे, त्या पिकांसाठी ही थंडी पोषक आहे. गेल्या तीन वर्षापासून बुलडाणा शहरातील तापमान हे हिवाळ््यात किमान एकदा निच्चांकी पातळीवर जात असल्याचा अनुभव असून यंदा हे रेकॉर्ड मोडल्या जाते की काय? अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. समुद्रसपाटीपासून बुलडाण्याची उंची ही दोन हजार १९० फूट आहे. अर्थात दार्जिलिंगच्या एकतृतियांश ती आहे. त्यामुळे हिवाळ््यात बुलडाण्याचे तापमान कमी होण्याची तशी परंपराच आहे. यंदा वार्षिक सरासरीच्या २२ टक्के पाऊस जास्त पडला आहे. त्यातच परतीच्या व अवकाळी पावसाने कहर केल्याने अद्यापही जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्द्रता आहे. परिणामी रब्बीचा पेराही अपेक्षेप्रमाणे होऊ शकला नाही. त्यामुळे जे काही पेरले आहे, अशा पिकांना ही थंडी पोषक ठरणारी असल्याचे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, दिवसभर बुलडाणा शहर परिसरात बाष्पयुक्त धुक्याची चार होती. पहाटे त्यामुळे दृष्यता अवघी दोन मिटरच्या आसपास असल्याचा अंदाज होता. दुपार दरम्यान, हे धुके कमी झाले मात्र सायंकाली पुन्हा त्यात वाढ झाली. तापमान कक्षा ५.२ वरमंगळवारी बुलडाणा शहराची तापमान कक्षा ही ५.२ वर होती. सकाळचे न्युनतम आणि सायंकाळचे अधिकतम तापमानातील तफावत म्हणजे तापमान कक्षा होय. साधारणत: ही तापमान कक्षा किमान १५ अंश सेल्सिअसच्या आसपास असणे गरजेचे आहे. मात्र मंगळवारी नोंदविण्यात आलेल्या तापमानाची आकडेवारी पाहता ही तामानकक्षा विषम असल्याचे दिसून येते.

तापमानात सातत्याने घटबुलडाणा शहराच्या सकाळच्या तापमानामध्ये ११ डिसेंबर पासून सातत्याने घट होत आहे. ११ डिसेंबरला १६.६ अंश सेल्सिअसच्या आसपास असणारे हे तापमान १२ आणि १५ डिसेंबरचा अपवाद वगळता सातत्याने कमी होत आहे. त्यातच आज तापमानाची नोंद ही यंदाच्या हिवाळ््यातील निच्चांकी नोंद आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाweatherहवामान