शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

बुलडाणा : दाताळा येथे विवाहितेची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 1:52 AM

मलकापूर (बुलडाणा): किरकोळ कौटुंबिक वादातून सासरच्या मंडळींनी धारदार शस्त्राने वार करून २३ वर्षीय विवाहितेची हत्या केल्याची घटना मलकापूर तालुक्यातील दाताळा येथे रविवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली.

ठळक मुद्देपतीसह सासरकडील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल पत्नीचा मृत्यू झाल्याचे कळताच पतीने केले विष प्राशन

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर (बुलडाणा): किरकोळ कौटुंबिक वादातून सासरच्या मंडळींनी धारदार शस्त्राने वार करून २३ वर्षीय विवाहितेची हत्या केल्याची घटना मलकापूर तालुक्यातील दाताळा येथे रविवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली. दरम्यान, याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी मृत विवाहितेच्या पित्याने दिलेल्या तक्रारीवरून मृत महिलेचा नवरा, सासू, सासरा आणि नणंद अशा चार जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मृत विवाहितेच्या पतीनेही विष प्राशन केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले असून, त्यास बुलडाणा येथे उपचारासाठी हलविण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.रेखा योगेश तायडे (वय २३) असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. तिचा विवाह हा दाताळा येथील रहिवासी योगेश दिगंबर तायडे (२८)  याच्याशी झाला होता. तिला सासरी क्षुल्लक कारणावरून शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता. त्याचे पर्यवसान खुनात झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. यासंदर्भात मृत विवाहितेचे पिता कैलास नामदेव गव्हाळे (वय ५१ रा., घिर्णी, ता. मलकापूर) यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले की, रेखा हिला तिच्या सासू व पतीकडून घरगुती कारणावरून वारंवार मारहाण होत असे. नणंद विजया शेगोकार व सासरे प्रल्हाद तायडे दोघे त्यासाठी भडकविण्याचे काम करीत होते.  दरम्यान, रविवारी सासू व पती यांनी संगनमताने धारदार शस्त्राने रेखाच्या गळ्यावर, डोक्यावर, मनगटावर, पायावर सपासप वार करून तिची हत्या केल्याचे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी कैलास गव्हाळे यांच्या फिर्यादीवरून मृतक विवाहितेचा पती योगेश दिगंबर तायडे (वय २८), सासू गं.भा. निर्मला दिगंबर तायडे (वय ५८), सासरा प्रल्हाद तुळशिराम तायडे (वय ५२, रा. दाताळा) आणि नणंद विजया जगन्नाथ शेगोकार (वय ३0, रा. मलकापूर) अशा चौघांविरुद्ध अपराध नं. २४२/१७ कलम ३0२, ४९८ अ, ३४ भादंविचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय साळुंके हे करीत आहेत. मृत रेखा रक्ताच्या थारोळ्य़ात दाताळ्य़ातील भगवान गल्लीत राहत्या घरी पडली होती. घटनेची वार्ता गावभर लगोलग पसरली. नागरिक जमा झाले. त्यांनी रुग्णवाहिका बोलावली. स्थानिक डॉक्टरांनी रेखाला मृत घोषित केले. त्यामुळे शासकीय कर्मचार्‍यांनी मृतदेह नेण्यास नकार दिला. परिणामी खासगी वाहनास पाचारण करण्यात आले. मृतदेह मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. त्यावेळी मृत विवाहितेस माहेराहून शेताच्या हिश्शाचे पैसे माग, असा तकादा सासरच्यांनी लावला होता, अशी चर्चा घटनास्थळी असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :malkapur bypassमलकापूर बायपासbuldhanaबुलडाणाCrimeगुन्हाDeathमृत्यू