Buldhana: भरधाव लक्झरीच्या धडकेत एकजण जागीच ठार, जयपूर लांडे फाट्यावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 15:51 IST2023-08-26T15:51:40+5:302023-08-26T15:51:54+5:30
Accident: भरधाव लक्झरीच्या धडकेत एक जण जागीच ठार झाला. खामगाव शेगाव रस्त्यावरील जयपूर लांडे फाट्यावर ही घटना शनिवारी सकाळी घडली.

Buldhana: भरधाव लक्झरीच्या धडकेत एकजण जागीच ठार, जयपूर लांडे फाट्यावरील घटना
- अनिल गवई
खामगाव - भरधाव लक्झरीच्या धडकेत एक जण जागीच ठार झाला. खामगाव शेगाव रस्त्यावरील जयपूर लांडे फाट्यावर ही घटना शनिवारी सकाळी घडली.
खामगाव तालुक्यातील कोक्ता येथील सहदेव प्रल्हाद ताठे (५०) दुचाकीने शेगाव कडे जात होते. त्याचवेळी विरूध्द दिशेने एमएच ३० बीडी २६८९ या क्रमांकाची लक्झरी बस येत होती. दरम्यान, जयपूर लांडे फाट्यानजीकच्या उड्डाण पुलाखाली भरधाव लक्झरीने त्यांना जबर धडक दिली. ही धडक इतकी भीषण की, सहदेव ताठे यांची दुचाकी लक्झरीच्या खाली घुसली होती. या अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनाम्यानंतर ताठे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खामगाव येथील सामान्य रूग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी गणेश ताठे यांच्या तक्रारीवरून अपघातास कारणीभूत असलेल्या लक्झरी चालकाविरोधात भादंवि कलम २७९, ३०४ अ, ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला.