शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
2
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
3
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
4
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
5
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
7
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
8
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
9
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
10
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
11
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
12
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
13
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
14
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
15
‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
16
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
17
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
18
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
19
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
20
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 

बुलढाण्याच्या प्रश्नांवर विधानसभेत रणकंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 2:05 PM

बुलडाणा: इंग्रजकालीन वसलेल्या टुमदार बुलडाणा शहराच्या झालेल्या बकाल अवस्थेविरूध्द गुरूवारी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधीमुळे रणकंदन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: इंग्रजकालीन वसलेल्या टुमदार बुलडाणा शहराच्या झालेल्या बकाल अवस्थेविरूध्द गुरूवारी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधीमुळे रणकंदन झाले.दरम्यान ठोस भुमिकेचा आग्रह धरणाऱ्या आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या समर्थनार्थ विरोधी पक्ष नेत्यांसह उपस्थित सदस्यांनी चढविलेला हल्ला लक्षात घेता बुलडाणा शहराच्या प्रश्नांबाबत विधानसभा अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज संपण्याच्या आत विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात नगर विकास विभागाचे राज्य मंत्री, विरोधी पक्ष नेते, आ. हर्षवर्धन सपकाळ व नगर विकास विभागाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांची विशेष बैठक रात्री उशिरा घेण्यात आली.बुलडाणा शहरातील अस्वच्छता, दूषित पाणी पुरवठ्यामुळे नगरिकांचे धोक्यात आलेले आरोग्य, अंतर्गत रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाढलेले अपघात व मणक्यांचे आजार, बंद पडलेले पथदिवे, दलीत वस्ती सुधार योजनेतील अपहार, एलईडी लाईट घोटाळा, रखडलेले नाट्यगृह इत्यादी अनेक महत्त्वपूर्ण विषयावर आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून गुरूवारी कामकाजाच्या पहिल्याच तासात नगर विकास राज्यमंत्र्यांना धारेवर धरले. सभागृहास वितरीत करण्यात आलेले लेखी उत्तर हे गुळगुळीत व पारंपारिक प्रशासकीय धाटणीतील असल्याचा आरोप करून जनहितासाठी शासन ठोस भुमिका घेणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सुमारे १५ मिनिटे चाललेल्या या चर्चेत नगर विकास राज्यमंत्री वस्तुस्थितीला बगल देत होते. शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच नगर परिषदेच्या गलथानपणाबद्दल दोषी अधिकाºयावर कारवाई व गंभीर तक्रारींच्या अनुषंगाने सर्वंकष चौकशीची मागणी आ. सपकाळ यांनी रेटून धरली होती. त्यामुळे सभागृहात कोंडी निर्माण झाली व अखेरीस अध्यक्षांनी दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. मात्र शहराच्या समस्यां व विकास निधीच्या मागणीबाबत सरकार गंभीर नसल्याने आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी सभागृहातील वेलमध्ये बैठा सत्याग्रह सुरू केला. त्यांच्या या सत्याग्रहाला समर्थन देत आ. विरेंद्र जगताप, आ. राहुल बोंद्रे, आ. यशोमती ठाकूर यांनी सुध्दा ठिय्या दिला. यावेळी पालिकेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान आदिवासी मंत्री प्रा. अशोक उईके, नगर विकास राज्यमंत्री योगेश सागर आ. हर्षवर्धन सपकाळ यांची समजूत काढली.दरम्यान सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाले. यावेळी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, जेष्ठ नेते अजितदादा पवार, जयंतराव पाटील यांनी सुध्दा आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलडाणा शहराबाबत सभागृहात अनेकदा प्रश्न उपस्थित करून देखील शासन उदासिन असल्याचे सांगून ठोस भुमिका जाहीर करण्याबाबत मागणी केली.अखेरीस सभागृहातील सर्व विरोधी पक्ष सदस्यांचा वाढता पाठींबा लक्षात घेता विधानसभेच्या अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज संपण्याच्या आत उपाध्यक्षांच्या दालनात या मुद्द्यांवर बैठक घेण्याचे आश्वासन दिले. ही बैठक मग नंतर रात्री उशिरा घेण्यात आली असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता बुलडाणा शहरातील ज्वलंत समस्यांसंदर्भात या बैठकीत नेमके काय निर्णय झाले याबात सविस्तर माहिती मिळू शकली नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळ