बुलडाणा जिल्ह्याची हिवताप निर्मूलनाकडे वाटचाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 05:37 PM2018-04-24T17:37:08+5:302018-04-24T17:37:08+5:30

जिल्ह्यात सन २००८ मध्ये असलेले २३२ रूग्णांचे प्रमाण सन २०१७ मध्ये  ३२ वर आले असून जिल्ह्याची हिवताप निर्मूलनाकडे वाटचाल सुरू झाली आहे.

Buldhana district leads to malaria eradication | बुलडाणा जिल्ह्याची हिवताप निर्मूलनाकडे वाटचाल 

बुलडाणा जिल्ह्याची हिवताप निर्मूलनाकडे वाटचाल 

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील काही तालुक्यातच हिवतापाचे रूग्ण आढळून येत आहेत. ज्या गावात मजुरांचे स्थलांतरण सुरू असते, अशी गावे संवेदनशिल आहे. मृत्यूचे प्रमाण ० असून हिवताप रूग्ण संख्येमध्ये कमालीची घट होत असून जिल्हा हिवताप निर्मुलनाकडे वाटचाल करीत आहे.

 
- हर्षनंदन वाघ

बुलडाणा : शासकीय यंत्रणा, खाजगी विविध संघटना, सोशल ग्रुपस, समाजसेवी संस्था, शाळा महाविद्यालय इत्यादींनी राष्टÑीय पातळीपासून तर ग्रामपातळीपर्यंत राबविलेल्या स्वच्छता अभियान व किटकजन्य रोगांबाबत केलेल्या व्यापक जनजागृतीमुळे स्वच्छतेचे महत्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे मागिल दहा वर्षात हिवताप रूग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात सन २००८ मध्ये असलेले २३२ रूग्णांचे प्रमाण सन २०१७ मध्ये  ३२ वर आले असून जिल्ह्याची हिवताप निर्मूलनाकडे वाटचाल सुरू झाली आहे.
हिवताप म्हणजे थंडीताप हा एक किटकजन्य रोग असून यामध्ये व्यक्तीचा मृत्यू देखील संभवतो. या रोगाला कारणीभूत असलेल्या किटकांमध्ये सर्वात महत्वाचा किटक म्हणजे डास. मादी डास चावल्यामुळे एका व्यक्तीच्या शरीरातील जंतु दुसºया व्यक्तीच्या शरीरात जातात व या रोगाचा फैलाव होतो. यापूर्वी हिवतापाचा उद्रेक झाल्याने हजारो लोकांना याची बाधा झाल्याने मृत्यूचे प्रमाण जास्त होते. परंतु जिल्ह्यातील मागील १० वर्षाच्या हिवताप रूग्ण संख्येचा अभ्यास केला असता मृत्यूचे प्रमाण ० असून हिवताप रूग्ण संख्येमध्ये कमालीची घट होत असून जिल्हा हिवताप निर्मुलनाकडे वाटचाल करीत आहे.   जिल्हाभरातील शासकीय यंत्रणा, खाजगी विविध संघटना, सोशल ग्रुपस, समाजसेवी संस्था, शाळा महाविद्यालय इत्यादींनी राष्टÑीय पातळीपासून तर ग्राम पातळीपर्यंत राबविलेल्या स्वच्छता अभियान व किटकजन्य रोगांबाबत केलेल्या व्यापक जनजागृतीमुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होवून लोकांना स्वच्छतेच महत्व समजले. 
त्यामुळेच हिवताप रूग्ण संख्येमध्ये घट होण्यास महत्वाची ठरली.  आरोग्य विभागाकडून हिवताप रूग्ण आढळून आलेल्या गावांमध्ये काही प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येतात. त्यात हिवताप रूग्णास विनामुल्य समुळ उपचार करणे, हिवताप रूग्णाच्या घरातील सर्वांचे रक्त गोळा करणे व तपासणी करणे, हिवताप रूग्णाच्या परिसरातील ५० घरांमध्ये ताप रूग्णांचे सर्वेक्षण करणे, आवश्यक असल्यास किटकनाशक फवारणी करणे, जनतेला आरोग्य शिक्षण देणे. या सर्व उपाययोजनांमुळे जनतेमधील जंतुभार कमी होण्यास मदत होवून दुसºयांना लागणहोत नाही, उद्रेक होत नाही आणि होणारे संभाव्य मृत्यू टाळता येतात. 
या उपाययोजनामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यातच हिवतापाचे रूग्ण आढळून येत आहेत. त्यात मोताळा, जळगाव जामोद, मेहकर आदी तालुक्यांचा समावेश आहे. त्यातही डोंगरकडेला असणाºया गावांमध्ये, ज्या गावात मजुरांचे स्थलांतरण सुरू असते, अशी गावे संवेदनशिल आहे. यासाठी उपाययोजना म्हणून आरोग्य कर्मचारी बाहेरून येणाºया मजुरांवर लक्ष ठेवतात, त्यांच्या नोंदी ठेवतात, गृहितोपचार देतात तसेच मोठे बांधकाम मजुर, विटभट्टी मजुर उसतोड मजुर यांच्या कामाच्या ठिकाणी भेट देऊन त्यांना गृहितोपचार देतात. या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील हिवताप रूग्णांचे प्रमाण कमी होत आहे.  

Web Title: Buldhana district leads to malaria eradication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.