शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जि.प. अधिका-यांना धरले धारेवर

By admin | Updated: February 5, 2015 01:46 IST

मलकापूर, नांदुरा तालुक्याची आढावा बैठक, रक्षा खडसे आक्रमक.

बुलडाणा : रावेर मतदारसंघांतर्गत येणार्‍या मलकापूर व नांदुरा तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कलची आढावा बैठक खासदार रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत आज दि. ३ फेब्रुवारी रोजी पार पडली. यावेळी अधिकार्‍यांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने खासदार खडसे यांनी अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहात आज मलकापूर व नांदुरा तालुक्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणार्‍या शिक्षण, पाणी, आरोग्य व ग्रामीण विकासाबाबत खा. रक्षा खडसे यांनी आढावा घेतला. यावेळी अनेक अधिकार्‍यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. बैठकीस उपस्थित अधिकार्‍यांनी उत्तरे न दिल्यामुळे यांनी कानउघाडणी केली. यावेळी त्यांनी गावात तलाठी, ग्रामसेवक यांना आपल्या वेळेत उपस्थित राहून जनतेची कामे करावीत, असे स्पष्ट निर्देश दिले. ज्या अधिकार्‍यांकडे जास्त गावाचा प्रभार आहे, त्यांनी संबंधित गावातील उपस्थितीचा वार ठरवून त्याची माहिती गावकर्‍यांना द्यावी, आपल्या मुख्यालयी जनतेला बोलावून आर्थिक भुर्दंड देऊ नये, अशा शब्दात त्यांनी सुनावले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, प्रकल्प अधिकारी अनुप शेनगुलवार, अतिरिक्त मुकाअ हजारे, नांदुरा सभापती अनिल इंगळे, योगेंद्र गोडे, भाजप महिला आघाडीच्या वैशाली डाबेराव, एकनाथ खर्चे आदी उपस्थित होते.