शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

बुलडाण्याचे रविकांत तुपकर माढा मतदारसंघाचे उमेदवार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:35 AM

बुलडाणा : २0१९ मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शे तकरी संघटनेने तयारी सुरु केली असून माढा लोकसभा मतदारसंघातून मुळचे  बुलडाण्याचे असलेले वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर  यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. 

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक‘स्वाभिमानी’ची तयारी

नीलेश जोशी। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : २0१९ मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शे तकरी संघटनेने तयारी सुरु केली असून माढा लोकसभा मतदारसंघातून मुळचे  बुलडाण्याचे असलेले वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर  यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. शनिवारी पंढरपूरनजीक स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी माढा  लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवाराचीही चर्चा करण्यात आली. यावेळी  रविकांत तुपकर हे सर्वसमावेशक उमेदवार ठरतील अशी भावना कार्यकर्त्यांनी  व्यक्त केली.माढा लोकसभा मतदार संघात २0१४ च्या निवडणुकीदरम्यान रविकांत तुपकर  यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला होता. सांगोला, करमाळा, माढा, पंढरपूर  तालुक्याचा अर्धा भाग, माळशिरस, मान, खटाव, फलटण या भागात तुपकर  यांचा एक आक्रमक युवा नेता अशी ओळख आहे. स्वाभिमानीच्या प्रचाराची सं पूर्ण धुरा यांनी अत्यंत प्रभावीपणे सांभाळताना तळागाळातील कार्यकर्त्यांंशी संवाद  साधला होता. ऊस दरवाढ आंदोलनात तुपकर यांनी आक्रमक नेतृत्व करताना  शेतकर्‍यांच्या बाजून निर्णय घेण्यास भाग पाडले होते. यामुळे ते सामान्य कार्यक र्त्यांमध्ये चांगलेच रुळले होते. गतवेळी अवघ्या २८ हजार मतांनी त्यावेळी  स्वाभिमानीचे उमेदवार सदाभाऊ खोत पराभूत झाले होते. 

खा. शेट्टीचे कट्टर सर्मथकस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भात जाळे विणण्याचे काम रविकांत तु पकरांनी चांगल्या प्रकारे केले आहे. खा. शेट्टी यांचे सर्मथक असलेल्या तु पकरांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेले वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्षपदही  मिळाले होते. खा. शेट्टी यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर  तुपकर यांनी ‘लाल दिवा’ सोडून खा. शेट्टींच्या खांद्याला खांदा लावून काम  करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना गळाला लावण्याचे प्रयत्नही सत्ताधारी पक्षा तील काही नेत्यांनी केले होते. परंतु त्यांनी स्वाभिमानीसोबतच राहण्याचा निर्णय  घेतला होता, हे विशेष.

सक्षम पर्याय!कृषी राज्यमंत्री पद मिळाल्यानंतर खा. शेट्टी व सदाभाऊ खोत यांच्यात बेबनाव  झाला होता. शेतकर्‍याच्या प्रश्नावर संघटनेने महायुतीमधून बाहेर पडण्याचा  निर्णय घेतल्यानंतर खोत मंत्रीपदावर कायम होते. अखेर संघटनेने त्यांना पक्षातून  काढले होते. आगामी निवडणुकीत संघटनेतेतर्फे रविकांत तुपकर हेच सक्षम  पर्याय असल्याचे बोलले जाते. 

योग्य व सक्षम उमेदवार आम्ही माढा लोकसभा मतदार संघात देणार आहोत.  यामध्ये आमच्यासमोर काही पर्याय असले तरी रविकांत तुपकर यांच्या नावाचा  प्रामुख्याने विचार करीत आहोत. बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीनेही  आमची तयारी आहे.- राजू शेट्टी, खासदार, स्वाभीमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना