बुलडाणा जिल्ह्यात १.९३ लाख शेतकऱ्यांनी उतरवला पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 12:33 PM2019-08-02T12:33:30+5:302019-08-02T12:33:40+5:30

बुलडाणा : प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत जिल्ह्यातील जवळपास १ लाख ९३ हजार ९५१ शेतकऱ्यांनी विविध पिकांचा विमा उतरविला आहे़.

In Buldana district, 1.19 lakh farmers take crop insurance | बुलडाणा जिल्ह्यात १.९३ लाख शेतकऱ्यांनी उतरवला पीक विमा

बुलडाणा जिल्ह्यात १.९३ लाख शेतकऱ्यांनी उतरवला पीक विमा

googlenewsNext

- ब्रम्हानंद जाधव 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत जिल्ह्यातील जवळपास १ लाख ९३ हजार ९५१ शेतकऱ्यांनी विविध पिकांचा विमा उतरविला आहे़.  तांत्रिक अडचणीमुळे पीकविमा भरण्यास होणारा विलंब लक्षात घेवून शासनाच्या वतीने पीकविमा भरण्याची मुदत वाढवून ३१ जुलै केली होती. दाने दिवसांच्या या मुदतवाढीचा जिल्ह्यातील १८ हजार २५६ शेतकºयांनी फायदा घेतला.
प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जवळपास १ लाख ९३ हजार ९५१ शेतकºयांनी खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर आदी पिकांचा पीकविमा उतरविला आहे. ५०३ कोटी ५ लाख २८ हजार ४८१ रूपयांची विमा राशी आहे. जिल्ह्यात यंदा कुठे दमदार तर कुठे साधारण पाऊस आहे.
गत चार वर्षापासून शेतकºयांवर सतत अस्मानी संकटाचे मोठे सावट राहत असल्याने शेतकरी दरवर्षी पिकांचा विमा उतरवत असल्याचे दिसून येते. बहुतांश ठिकाणी आजही पिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. तर बुलडाणा तालुक्यात अतिपावसाने अनेक शेतकºयांची पिकेच खरडून गेल्याचा प्रकार मागील महिन्यात घडला. त्यामुळे पिक खरडून गेलेल्या बहुतांश शेतकºयांनी पीक विमा उतरवला आहे.
गेल्यावर्षी २ लाख ६७ हजार २९९ शेतकºयांनी १ लाख ९६ हजार ९९४ हेक्टर क्षेत्रावरी पिकांचा विमा उतरवला होता. त्यापैकी ३ हजार ७८१ लाभार्थी शेतकºयांना २.३४ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.


बँकेत चकरा
मागील वर्षी २ लाखावर शेतकºयांनी खरीप हंगामाचा पीक विमा उतरवला होता. दरम्यान, शासनाने दुष्काळही जाहीर केला. त्यामुळे गतवर्षी विम्याचा लाभ अनेक शेतकºयांना अद्यापपर्यंत मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी वारंवार बँकेत चकरा मारताना दिसून येत आहेत. गतवर्षीच्या विम्याची शेतकºयांना प्रतीक्षा लागली आहे.


विमा संरक्षण कोणाला?
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास या योजनेत सहभागी शेतकºयांना विमा संरक्षण मिळणार.


विमा हप्ता किती?
खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकºयांना अन्नधान्य व गळीत धान्य पिकांकरिता विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के तर नगदी पिकांकरिता ५ टक्के हप्ता शेतकºयांना भरावा लागणार आहे.

Web Title: In Buldana district, 1.19 lakh farmers take crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.