बुलडाणा : रिपाइंच्या जिल्हा सचिवांचा अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:45 IST2018-01-31T00:44:47+5:302018-01-31T00:45:17+5:30
मलकापूर : बुलडाणा जिल्हा रिपाइंचे (आठवले) सचिव गजानन अवसरमोल यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले होते. बुलडाणा येथील डॉ. सोळंके रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. दरम्यान, त्यांचा सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.

बुलडाणा : रिपाइंच्या जिल्हा सचिवांचा अपघातात मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : बुलडाणा जिल्हा रिपाइंचे (आठवले) सचिव गजानन अवसरमोल यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले होते. बुलडाणा येथील डॉ. सोळंके रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. दरम्यान, त्यांचा सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.
तालुक्यातील बहापुरा येथील रहिवासी तथा रिपाइंचे (आठवले) सचिव गजानन अवसरमोल त्यांच्या दुचाकीवर (एमएच २८-एडी २२) परतीच्या वाटेवर असताना राष्ट्रीय महामार्ग ६ वरील मुंदडा पंपानजीक डेहरादून ढाब्यासमोर त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली.
शनिवारी घडलेल्या या घटनेत गंभीर जखमी गजानन अवसरमोल यांना आधी मलकापूर त्यानंतर बुलडाणा येथे डॉ. सोळंके यांच्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. दरम्यान, सोमवारी रात्री ८ वाजता त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी बहापुरा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.