शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

बुलडाणा:  परराज्यातील ८३० मजुरांना प्रशासनाने पाठविले स्वगृही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 10:18 AM

उत्तरप्रदेश व मध्यप्रदेश येथील एकूण ८३० मजूर बुलडाणा जिल्ह्यातून रवाना झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: लॉकडाउनमुळे जिल्ह्यात अडकलेले परराज्यातील कामगारांचे लोंढे आता स्वगृही जात आहेत. आतापर्यंत उत्तरप्रदेश व मध्यप्रदेश येथील एकूण ८३० मजूर बुलडाणा जिल्ह्यातून रवाना झाले आहेत. बिहार आणि झारखंडेचे मजूरही पुढील चार दिवसात पाठविण्यात येणार आहेत.जिल्ह्यात शासकीय निवारागृह, रस्ते काम, यासह खाजगी कामावर परराज्यातील अनेक मजूर होते. परंतू लॉकडाउनमुळे सर्व कामे बंद झाल्याने या मजूरांच्या हाताला काम राहिले नाही. सध्या राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यावरही परराज्यातील कामगार आहेत. परंतू कोरोना प्रादुर्भावाचा उद्रेक वाढतच असल्याने जिल्ह्यात असलेले परराज्यातील मजूर स्वगृही जात आहेत. काही मजूर यापूर्वी मिळेल त्या मार्गाने तर काहींनी पायी प्रवास करून स्थलांतर केले आहे. शासनाने रेल्वे, एसटी बसच्या माध्यमातून या मजूरांना स्वगृही पाठविण्याची मुभा दिली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. आतापर्यंत उत्तरप्रदेशचे ५१३, मध्यप्रदेशचे २४९ व प्रत्यक्ष भोपाळमध्ये राहणारे ६८ असे एकूण ८३९ मजूर रेल्वेने स्वगृही पाठविण्यात आले आहेत.जिल्ह्यात अडकलेले बिहार व झारखंडे येथील कामगार स्वगृही पाठविण्यात येणार आहेत. जिल्ह्यात झारखंडचे २५० कामगार आहेत. बिहारची रेल्वे १० मे व झारखंडसाठी १२ मे रोजी रेल्वे आहे. या रेल्वेने जिल्ह्यात अडकलेल्या मजूरांना स्वगृही पाठविण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त अडकलेल्या मजूरांना स्वगृही जाण्याचे नियोजन प्रत्येक तहसील स्तरावरही करण्यात येत आहे.दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील ५१ शिबीरामध्ये या मजुरांची राहण्याची व जेवनाची व्यवस्था करण्यात आलेली होती. जिल्ह्यातील ७० स्वयंसेवी संस्थांकडून त्यांना भोजन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनानही ५४६ परराज्यातील मजुरांची जेवनाची व्यवस्था केली होती. दरम्यान, येत्या काही दिवसात आणखी मजुरांची जाण्याची व्यवस्था केली जात आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाLabourकामगारUttar Pradeshउत्तर प्रदेश