शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यासाठी निवडणुकीवर बहिष्कार

By admin | Updated: September 28, 2014 23:30 IST

खामगाव तालुक्यातील बेलुरा येथील ग्रामस्थांचा इशारा

खामगाव (बुलडाणा): तालुक्यातील बेलुरावासीयांनी गावाला पक्का रस्ता नसल्याने होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून ग्रामस्थांनी दिला आहे. बेलुरा या गावाला पक्क्या रस्त्याने जोडण्यात आलेले नाही. रस्ता कामाचे भूमिपूजन होऊन फलकही लावण्यात आले; मात्र साधे खडीकरणसुद्धा झाले नाही. गावात इयत्ता चौथीपर्यंंतच शाळा असल्याने तसेच वैद्यकीय सुविधा नसल्याने तर शेतकर्‍यांना शेतमाल विक्रीसाठी पिंपळगाव राजा अ थवा खामगाव येथे रोज येणे-जाणे करावे लागते. मात्र पावसाळय़ात बेलुरागावाचा संपर्क तुटलेला असतो. रस्त्याचे खडीकरण व्हावे या करिता वेळोवेळी लोकप्रतिनिधी तसेच शासकीय अधिकारी यांच्याकडे लेखी तसेच तोंडी स्वरूपात निवेदने केलेली आहेत; परंतु आजपावेतो सदर रस्त्याचे कोणत्याही प्रकारचे मजबुतीकरण करण्यात आले नाही. लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी सदर रस्त्याच्या मजबुतीकरणाकरिता अथवा खडीकरणाकरिता भूमिपूजनाचे सोहळे केलेले असून, त्याबाबतचे फलकसुद्धा लावण्यात आले होते. तसेच सदर रस्त्याकरिता २0 लक्ष रुपये मंजूर झाल्याचे समजते; मात्र सदर रस्त्याचे खडीकरण अद्यापपावेतो झालेले नाही. त्यामुळे याची चौकशी व्हावी तसेच गावाला रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा १५ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. या निवेदनावर आदींच्या सहय़ा आहेत.