अमडापूर : येथून जवळच असलेल्या चिखली तालुक्यातील उंद्री गावाला महामार्गावरील पुलाखाली एका ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने मंगळवारी खळबळ उडाली. उंद्री ते खामगाव जाणाऱ्या महामार्गावर गावाला लागून पूल आहे. या पुलाखाली २५ एप्रिल रोजी सकाळी ३० वर्षीय विनोद वसंता चव्हाण रा.हरणी याचा मृतदेह आढळला. मृताचे वडील वसंता शामा चव्हाण (वय ५४) रा.हरणी याने अमडापूर पो.स्टे.ला माहिती दिल्यावरून पोलिसांनी नोंद घेऊन पुढील तपास ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार उमेश भोसले हे करीत आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}