शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदान महायज्ञास प्रारंभ, ५१ जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 11:42 IST

Lokmat Blood donation Mahayagya started : राज्याचे अन्न व अैाषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते ‘लाेकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्रामसेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार पासून रक्तदान महायज्ञाला प्रारंभ करण्यात आला. राज्याचे अन्न व अैाषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते ‘लाेकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी आ. हर्षवर्धन सपकाळ, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी राज्याचे अन्न व अैाषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, मा. आ. हर्षवर्धन सपकाळ व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तथा स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून या शिबारास प्रारंभ झाला. लोकमत परिवार आणि जिल्हा पोलिस दलाच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरामध्ये पहिल्या दिवशी २१ जणांनी रक्तदान केले. दरम्यान ‘लोकमत’ने २जुलै ते १५ जुलै पर्यंत आयोजित केलेला उपक्रम कौतुकास्पद असून कोरोनाच्या संकट काळात रुग्णांची गरज भागविण्याचे माेलाचे काम या माध्यमातून होत असल्याचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.  जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीच्या आधुनिकीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ४५ लाख रुपये त्यांनी दिले होते. त्यातून आणलेल्या  उपकरणाची पाहणी त्यांनी केली. यावेळी रक्तदान करणाऱ्या दात्यांची भेट घेऊन  त्यांची विचारपूस केली. 

सानंदा यांचे ६१ व्या वर्षी रक्तदान
रक्तदान महायज्ञात माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी वयाची तमा न बाळगता ६१ व्या रक्तदान केले. आतापर्यंतच्या जीवनात त्यांनी तब्बल ७० पेक्षाही अधिक वेळा रक्तदान केले आहे. रक्तदान हे पुण्यकर्म आहे. रक्तदानातून मानवी जीवनाला अमूल्य मदत करता येते. त्यामुळे रक्तदान करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.  यावेळी सानंदा यांनी उपस्थित रक्तदात्यांचा सत्कार केला.
 

टॅग्स :buldhanaबुलडाणाDr. Rajendra Shingeडॉ. राजेंद्र शिंगणेLokmat Eventलोकमत इव्हेंट