शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

पक्षी संवर्धनासाठी ‘एक घरटं बांधा चिऊसाठी’!

By admin | Updated: April 15, 2017 00:19 IST

चिखली- पक्षी टिकून राहावेत व त्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी येथील डॉक्टर दाम्पत्य सरसावले असून, पक्षी संवर्धनासाठी ‘एक घरटं बांधा चिऊसाठी’ हा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे.

पक्ष्यांसाठी पाण्याचे भांडे, खाद्याची सोयचिखली : भयानक उन्हाळा, वाढणारं तापमान आणि अक्षरश: करपून निघणारी वनराई. या सगळ्यात आपण स्वत:ला वाचवतो, पण पक्ष्यांचे काय? हा प्रश्न भेडसावल्याने इतक्या उष्णतेत व सिमेंटच्या जंगलातही पक्षी टिकून राहावेत व त्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी येथील डॉक्टर दाम्पत्य सरसावले असून, पक्षी संवर्धनासाठी ‘एक घरटं बांधा चिऊसाठी’ हा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे.येथील स्माइल केअर डेन्टल क्लिनिकचे डॉ.युवराज सिरसाट व डॉ.सायली सिरसाट यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. उन्हाळयात बऱ्याचदा पक्ष्यांना पाणी मिळत नाही. त्याचा मोठा फटका त्यांना बसत असतो. असे अनेक पक्षी मरतातही. त्यांना वाचवण्यासाठी सिरसाट दाम्पत्यांनी ९ एप्रिल रोजी जनमानसात जनजागृही व्हावी व पक्ष्यांचे संवर्धन व्हावे, म्हणून स्थानिक चिखली मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात एका शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात खामगाव येथील पक्षीमित्र संजय गुरव यांनी वाढते प्रदूषण, मानवी अतिक्रमण, तापमान यामुळे पक्ष्यांची संख्या कमी झाली असल्याने प्रत्येक नागरिकाने आपल्या घरातही पक्ष्यांचा किलबिलाट फुलविण्यासाठी व पक्षी संवर्धनासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. या शिबिरस्थळी पक्ष्यांसाठी लागणारे पाण्याचे भांडे, घरे, खाद्यांची बॉटलचे आदी साहित्य अत्यल्प दरात पक्षीप्रेमींसाठी उपलब्ध करून देण्यात आले. शिबिराला नगराध्यक्ष प्रिया बोंद्रे, चिखली अर्बनचे अध्यक्ष सतीश गुप्ता, डॉ.संध्या कोठारी, डॉ.वाघ, डॉ.शिंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ.योगेश काळे, संचालन डॉ.संदीप म्हस्के, तर आभार डॉ.युवराज सिरसाट यांनी मानले.