Bharat Bandh : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मलकापूरात रोखली रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 11:08 AM2020-12-08T11:08:52+5:302020-12-08T11:10:46+5:30

Bharat Bandh: शेतकरी स्वाभिमानी संघटनेने मलकापूर येथे चेन्नई अहमदाबाद एक्स्प्रेस रोखली.

Bharat Bandh: Swabhimani Shetkari Sanghatana stops train at Malkapur | Bharat Bandh : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मलकापूरात रोखली रेल्वे

Bharat Bandh : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मलकापूरात रोखली रेल्वे

Next

बुलडाणा : कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, शेतकरी स्वाभिमानी संघटनेने मलकापूर येथे चेन्नई अहमदाबाद एक्स्प्रेस रोखली.

सकाळी 6.40 वा. चेन्नई – अहमदाबाद एक्सप्रेस रोखून रविकांत तुपकरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावेळी रविकांत तुपकरांसह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात विविध राज्यातले शेतकरी बांधव तसेच शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. हे कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी दिल्लीत हजारो शेतकरी तळ ठोकून आहे. या पृष्ठभूमीवर बुलडाण्यात विविध पक्ष संघटनाने आंदोलनात्मक पवित्रा घेतला असून बंदचा परीणाम जाणवू लागला आहे तर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

नांदुरा येथे आमदार.राजेश एकडे यांनी रोखला महामार्ग

मलकापूर मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे यांच्या नेतृत्वात नांदुरा येथे कृषी विधेयकाविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वरील वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे विरोधात केलेल्या कायद्याला आता महाविकास आघाडी चा जाहीर पाठिंबा दिला आहे. त्या आंदोलनाला महाविकास आघाडी चा पाठिंबा असून मंगळवारी आमदार राजेश  एकडे यांनी व्यापा-यांना प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला आहे.  

Web Title: Bharat Bandh: Swabhimani Shetkari Sanghatana stops train at Malkapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.