KKR vs SRH Final : टॉस गमावूनही KKR च्या मनासारखेच झाले; श्रेयस अय्यरने मैदानावर उतरताच इतिहास घडवला

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ चा फायनल सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 07:06 PM2024-05-26T19:06:35+5:302024-05-26T19:06:55+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, KKR vs SRH Final Marathi Live : Sunrisers Hyderabad Won the Toss & elected to bat, Shreyas Iyer is the first IPL captain to lead 2 teams in an IPL final | KKR vs SRH Final : टॉस गमावूनही KKR च्या मनासारखेच झाले; श्रेयस अय्यरने मैदानावर उतरताच इतिहास घडवला

KKR vs SRH Final : टॉस गमावूनही KKR च्या मनासारखेच झाले; श्रेयस अय्यरने मैदानावर उतरताच इतिहास घडवला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, KKR vs SRH Final Marathi Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ चा फायनल सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर रंगणार आहे. २०१२ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने याच मैदानावर आयपीएल जेतेपद जिंकले होते आणि १२ वर्षानंतर त्यांना चेपॉकवर पुन्हा इतिहास घडवण्याची संधी आहे. पण, २०१४ मध्ये KKR च्या जेतेपदाच्या संघातील सदस्य पॅट कमिन्स यंदा त्यांच्याविरोधात मैदानावर आहे. सनरायझर्स हैदराबादने मोजलेले २०.७५ कोटी पॅट कमिन्सने योग्य ठरवले आणि त्याच्या नेतृत्वाखाली SRH ने फायनलमध्ये धडक दिली. २०१६ नंतर त्यांना जेतेपदाचा चषक उंचावण्याची संधी आहे. 


सुनील नरीन हा KKR च्या यशामागचा प्रमुख खेळाडू आहे. त्याने १४ सामन्यांत १७९.८५च्या स्ट्राईक रेटने ४८२ धावा केल्या आहेत आणि १६ विकेट्सही घेतल्या आहेत. आज त्याने १८ धावा करताच वेगळा विक्रम नावावर करेल. आयपीएलच्या एका पर्वात ५०० हून अधिक धावा आणि १५ हून अधिक विकेट्स घेणारा तो इतिहासातील पहिला खेाडू ठरेल. शिवाय रॉबिन उथप्पा, आंद्रे रसेल व गौतम गंभीर यांच्यानंतर KKR साठी एका पर्वात ५००+ धावा करणाऱ्या चौथ्या फलंदाजाचा विक्रमही त्याला खुणावतोय.  

दोन्ही संघाचा फायनलपर्यंतचा प्रवास...


पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये अब्दुल समदच्या जागी शाहबाज अहमद याला संधी दिली आहे. KKR चा कर्णधार श्रेयस अय्यर याने आम्हाला प्रथम गोलंदाजीच करायची होती असे म्हटले. श्रेयस अय्यर हा आयपीएल एतिहासातील एकमेव कर्णधार आहे की, वेगवेगळ्या संघाचे फायनलमध्ये (Delhi Capitals in 2020 and Kolkata Knight Riders in 2024) नेतृत्व करणार आहे. यापूर्वी त्याच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल फायनल खेळली होती.  
 

Web Title: IPL 2024, KKR vs SRH Final Marathi Live : Sunrisers Hyderabad Won the Toss & elected to bat, Shreyas Iyer is the first IPL captain to lead 2 teams in an IPL final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.