शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

Bhaiyyuji Maharaj suicide : ​​​​​​​पारध्यांची पोरं झाली पोरकी ! 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 7:40 PM

विज्ञानाला अध्यात्माची जोड देत समाजातील दुर्लक्षीत घटकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भय्यूजी महाराजांनी अविरत कार्य केले.

- योगेश फरपट

खामगाव : विज्ञानाला अध्यात्माची जोड देत समाजातील दुर्लक्षीत घटकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भय्यूजी महाराजांनी अविरत कार्य केले. पारधी समाजातील मुला-मुलींना शिक्षणाचे द्वार खुले व्हावे यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सजनपूरी भागात भय्यूजी महाराजांनी निवासी आश्रमशाळा सुरु केली. त्यांच्या अचानक जाण्याने आश्रमशाळेतील मुलांनाच नव्हेतर इथे काम करणा-या शिक्षक वर्गालाही धक्का बसला असून आमचा ‘पालनहार’ हरवला असल्याचे सांगत एका शिक्षकाला रडू कोसळले.जिल्हयातीलच नव्हेतर महाराष्ट्रातील आदिवासी व पारधी समाजातील मुले, मुलींना शिक्षणाची निवासी सुविधा उपलब्ध व्हावी या हेतूने डॉ. प.पू. श्री. भय्यूजी महाराजांनी दहा वर्षापूर्वी खामगावातील सजनपूरी भागात ९ जून २००६ रोजी सुर्याेदय पारधी समाज आदिवासी आश्रमशाळा सुरु केली.  या  आश्रमशाळेला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. पारधी समाजाशिवाय आदीवासी प्रवर्गातील इतर मुलेही याठिकाणी शिक्षण घेत आहेत. दीडशे मुलांपासून सुरवात झालेल्या या आश्रमशाळेत सद्यस्थितीत ६१८ मुले-मुली निवासी शिक्षण घेत आहेत. शिक्षणासोबत अध्यात्माचे ज्ञान याठिकाणी मिळत होते. याशिवाय एक संस्कारक्षम युवक घडविण्यावर महाराजांनी भर दिला होता. आश्रमशाळेत शिकणा-या प्रत्येक विद्यार्थ्याचा शारिरिक, मानसिक व अध्यात्मिक विकास झालाच पाहिजे याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. त्यासाठी ते दर महिन्याला एकदा मुलांची भेट घेत असत. आश्रमशाळेच्या बाजूलाच ‘ऋषीसंकूला’चे निर्माण केले. याठिकाणी मुलांना अध्यात्माचे शिक्षण याठिकाणी मिळते. संगीत, खेळ, कला, साहित्य, धर्म अशा विविध पातळीवरील शिक्षणाची सुविधा एकाच व्यासपिठावर मिळते. सुर्याेदय निवासी आश्रमशाळेतील अनेक मुले आज शासनाच्या विविध पदावर कार्यरत आहेत. याशिवाय पारधी समाजाच्या उत्थानासाठी झटत आहेत. महाराजांच्या अचानक निधनाची वार्ता कळताच आश्रमशाळेवर दुखा:चा डोंगरच कोसळला. 

महाराजांना मुलांवर विशेष प्रेम होते. खामगाव आले की मुलांना भेटल्याशिवाय ते जात नव्हते. आश्रमशाळेच्या स्थापनेपासूनच महाराजांसोबत राहिलो. पारध्यांच्या मुलांविषयीची त्यांची तळमळ पाहून आम्हालाही अधिक काम करण्याचा हुरूप यायचा. त्यांच्या जाण्याने पारध्याची पोरं आता पोरकी झाली आहेत. त्यांचे काय होईल याचीच चिंता सतावत आहे. - गोवर्धन टिकार, शारिरिक शिक्षक, सुर्योदय पारधी समाज आदिवासी आश्रमशाळा, खामगाव. 

टॅग्स :Bhayyuji Maharajभय्यूजी महाराजbuldhanaबुलडाणाDeathमृत्यूsocial workerसमाजसेवक