शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

केळीचे पीक झाले भुईसपाट

By admin | Updated: June 4, 2014 00:47 IST

संग्रामपूर तालुक्यातील २ जून रोजी रात्री अचानक झालेल्या वादळी वार्‍याने केळीचे पिक भुईसपाट.

काकणवाडा: संग्रामपूर तालुक्यातील काकणवाडा येथे १ व २ जून रोजी रात्री अचानक झालेल्या वादळी वार्‍याने केळीचे पिक भुईसपाट केले आहे. यामध्ये हजारो खोड उध्वस्त झाले आहेत. अचानक आलेल्या या आघाताने सर्वसामान्य जनतेचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या नैसर्गिक अवकर्षणाचा महसूल विभागाकडून सर्व्हे करण्यात आला असून नुकसानग्रस्तांना आता मदतीची आस लागली आहे. काकणवाडा गावात केळीचे उत्पादन घेणारे शेतकरी जास्त आहेत. लहान मुलांच्या संगोपनापेक्षाही जास्त काळजी केळी पिकाची लागवड पासुन घ्यावी लागते. महागडा खर्च करून शेकडो एकरावर केळी लागवड करण्यात आली. निसर्गाच्या लहरीपणामुळे २ जुनची रात्र केळी पिकासाठी घातक ठरली. एकदम जोराची हवा सुटली आणि सर्वकाही हिरावून नेलं. वादळी पावसामुळे केळीचे झाडे उन्मळून पडली. परिसरातील ४0 ते ५0 एकारापेक्षाही जास्त क्षेत्रावरील झाडे उन्मळून पडली. ही झाडे पाहून ज्यांनी या पिकाच्या भरवशावर हिरवी स्वप्ने रंगवली होती. त्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला. भुईसपाट झालेल्या केळी पाहून बरेच कुटुंबांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आता पिकच उरले नाही तर पुढचे जगणे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. शासनाकडून भरीव भरपाईची मागणी होत आहे. महसुलविभागाकडून तलाठी कांबळे या नुकसानीचे सर्वेक्षण करीत आहेत. वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना पुन्हा उभं करण्यासाठी शासनाने भरघोस आर्थिक मदत देण्याची मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.