शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
3
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
4
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
5
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
6
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
7
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
8
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
9
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
10
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
11
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
12
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
13
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
14
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
15
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
16
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
17
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
18
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
19
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
20
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मंडळ अधिकाऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 08:54 IST

गौण खनिज वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकाने मंडळ अधिकार्‍यास ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी रात्री 12.30 वाजता घडली.

जलंब: गौण खनिज वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकाने मंडळ अधिकार्‍यास ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी रात्री 12.30 वाजता घडली. या प्रकरणी मंडळ अधिकारी यांनी पोलिसात तक्रार दिली असून, टिप्पर चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव झाला नसतानाही नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळी गौण खनिजाची चोरी होत आहे. त्यामुळे शेगाव तहसीलदारांनी रात्रीच्या वेळी पथके नेमून गौण खनिजाचे रक्षण करण्याची जबाबदारी मंडळ अधिकारी व तलाठ्यावर सोपवली आहे.

गुरुवारी रात्री माटरगावचे मंडलाधिकारी संजय बापुराव देशमुख हे ड्युटीवर असताना त्यांना एक टिप्पर गौण खनिज घेऊन जाताना आढळून आले, त्यामुळे त्यांनी पाठलाग करत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित टिप्पर चालकाने तहसीलच्या गाडीचा अपघात घडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तहसीलच्या वाहन चालक संतोष सातभाकरे यांनी समयसूचकता साधत गाडी बाजूला घेतली, यामुळे अपघात होण्यापासून टळला. याप्रकरणी संजय देशमुख यांनी जलंब पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. 
महिनाभरातील चौथी घटना
गौण खनिज रोखण्यासाठी ड्युटीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाहन घेऊन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची ही घटना महिनाभरातील चौथी घटना आहे, यापूर्वीसुद्धा पोलीस स्टेशनला व जिल्हा प्रशासनाकडे कर्मचाऱ्यांनी तक्रारी दाखल केलेल्या आहेत.