शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

वनजमिनीवरील अतिक्रमणधारकांचा पोलिस व वन कर्मचा-यावर हल्ला  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 10:08 PM

वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकावर आदीवासींनी केलेल्या हल्ल्यात पोलिस उपनिरिक्षक अरुण शालिग्राम किरडे यांच्यासह १२ पोलिस व वन कर्मचारी जखमी झाले.

बुलडाणा - वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकावर आदीवासींनी केलेल्या हल्ल्यात पोलिस उपनिरिक्षक अरुण शालिग्राम किरडे यांच्यासह १२ पोलिस व वन कर्मचारी जखमी झाले. ही घटना २२ मे रोजी दुपारी २ वाजता घडली. याप्रकरणी मंगळवारी रात्री ८.३० वाजता ११ आदीवासींना पोलिसांनी अटक केली आहे. वनपरिक्षेत्र जळगाव जामोदअंतर्गत येणाºया जामोद वतुर्ळातील शिवारात वनजमिनीवर अतिक्रमण केलेल्या भिलाला व बारेला  या आदिवासींनी अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या वनकर्मचारी व पोलिसांवर दुपारी दगडफेक केली. यामध्ये जळगाव पोलीस उपनिरीक्षक किरडे जखमी झाले. पोलीस कर्मचारी व वनकर्मचारी मेंढामारी शिवारातील वनविभागाच्या जमिनीवर असलेले अतिक्रमण काढण्यासाठी गेले असता प्यारसिंग लढवले, गोपाल मुझेल्दा,  भीलसींग तडवले, सुरेश तडवले, मांगीलाल मुजालदा, शीला तडवले, रायजा तडवले, राजल मुजाल्दा, कुसुम तडवले, रंजना तडवले, बिन्दा तडवले, सताबाई तडवले, अनिल तडवले, भाईलाल भिलाला, बीरलाल तडवले, अंबालाल तडवले, दिलीप तडवले, श्रावण तडवले, विजय तडवळे, बिनाबाई अडवले, चैनीबाई तडवले, करमाबाई तडवले, रिंकी तडवले इतर सात आठ जणांनी हातात कुºहाड दांड्याला गोफण  लावून दगड मारून जखमी केले. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक अरुण शालिग्राम किरडे व इतर पोलिस व वन विभागाचे एकुण १२ कर्मचारी जखमी झाले. 

पोलिसांचा गोळीबार जीव वाचवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. तेव्हा आदीवासी पळून गेले. तरी केलेल्या दगडफेकीत कर्मचारी मात्र जखमी झाले. यातील पोलिस उपनिरिक्षक अरुण शालिग्राम किरडे यांच्यावर शेगाव येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. काही कर्मचाºयावर खासगी तर काहींवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

११ आदीवासींना अटक याप्रकरणी वन कर्मचारी सलीम खान गुलशान खान यांच्या तक्रारीवरुन आदीवासींविरुद्ध जळगाव जामोद पोलिस स्टेशनला अपराध नंबर २४२ /१८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जळगाव पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसbuldhanaबुलडाणा