शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

Video : जेटलींच्या निधनानंतरही मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा खामगावात पोहोचली, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 4:59 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या वैयक्तिक ट्विटच्या माध्यमातून जेटलींना श्रद्धांजली वाहिली.

बुलडाणा - भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनाच्या वृत्तानंतर देशभरात शोकाकुळ वातावरण निर्माण झाले आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात दुपारी 12 वाजून 07 मिनिटांनी जेटली यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत कळताच राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येऊ लागला. भाजपाच्या नेत्यांनी आपले नियोजित दौरे तात्काळ रद्द केले. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अबुधाबीवरुन फोन करत जेटलींच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. विशेष म्हणजे जेटलींचे सुपुत्र रोहन यांनी मोदींना त्यांचा नियोजित दौरा पूर्ण करण्याचे बजावले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या वैयक्तिक ट्विटच्या माध्यमातून जेटलींना श्रद्धांजली वाहिली. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा पोहचली होती. तेथून बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानुसार, जेटलींना भुसावळ येथे श्रद्धांजली अर्पण करुन मुख्यमंत्र्यांनी खामगावच्या दिशेने आपली यात्रा सुरू केली. खामगाव येथे पोहोचल्यानंतर फडणवीस यांनी तेथील जमलेल्या जनसुमदायाला संबोधित केले. 

खामगावमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक फडणवीस यांची वाट पाहात होते. येथील व्यासपीठावर गेल्यानंतर फडणवीस यांनी, सर्वप्रथम जेटलींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर, आपल्या भाषणाला सुरुवात केली. मात्र, येथील भाषणात फडणवीस यांनी कुठल्याही राजकीय मुद्द्याला किंवा विरोधकांवरांना उद्देशून भाषण केले नाही. केवळ, जेटलींबद्दल, जेटलींच्या कार्यकर्तृत्वाबद्दल आणि जेटलींच्या व्यक्तीमत्वाबद्दल फडणवीस यांनी भाषण केले. तसेच, या भाषणानंतर कुठलिही नारेबाजी देण्यास कार्यकर्त्यांना मनाई केली होती. एक संवेदनशील नागरिक, कार्यकर्ता म्हणून आपण आपल्या नेत्याच्या निधनाने झालेली हानी, लक्षात घेऊन आपल्या संवेदना नेत्याप्रति व्यक्त केल्या पाहिजेत, असे फडणवीस यांनी म्हटले. 

खामगाव येथील भाषणात बोलताना फडणवीस म्हणाले की, येथे जमलेल्या लोकांना भेटणं, त्यांना सद्यपरिस्थितीबद्दल अवगत करणं आणि जेटलींना श्रद्धांजली अर्पण करणं गरजेचं असल्यामुळे मी यात्रा जागेवरच स्थगित न करता खामगावात पोहोचलो, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच, येथील भाषणाच्या शेवटी त्यांनी आपण आपली महाजनादेश यात्रा दोन दिवसांकरिता रद्द करत असल्याचं सांगितलं. जेटलींच्या अंत्यसंस्कारानंतरच यात्रेच्या पुढील कार्यक्रमास सुरूवात होईल, असेही फडणवीस म्हणाले. दरम्यान, जेटलींच्या निधनानंतरही फडणवीस यांची महाजनादेश यात्रा खामगावात पोहोचली, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मात्र, फडणवीस यांनी तेथील उपस्थित, जमलेल्या नागरिकांच्या भावनांची कदर करत खामगावात येऊन, जेटलींना श्रद्धांजली वाहून आपल्या यात्रेचा समारोप केला.  

पाहा, खामगाव येथील सभेचा व्हिडीओ -

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसArun Jaitleyअरूण जेटलीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाbuldhanaबुलडाणा