चिखली (जि. बुलडाणा): चिखलीहून बोरगाव काकडे या गावाकडे प्रवासी घेऊन जाणार्या अँपेचे टायर फुटल्याने हे वाहन उलटून झालेल्या अ पघातात ७३ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. ही घटना ५ जुलै रोजी दुपारी घडली. चिखली-खामगाव रोडवरील पेट्रोल पंपाजवळ हा अपघात घडला. यामध्ये तीन प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अँपे (एम.एच. २८ एच ३५७२) चे चिखली-खामगाव रोडवरील पेट्रोल पंपानजीक ट्यूब-टायर फुटल्याने भास्करराव खंडागळे याचे वाहनावरील नियंत्रण सुटले व अँपे रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातात आमखेड येथील जिजाबाई आत्माराम वाघ यांना गंभीर मार लागला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पारूबाई काकडे, कुशीवर्ता गुरव, चंद्रभागा काकडे या तीन महिला अपघातात जखमी झाल्या.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}