चाेरपांग्रा येथे आराेग्य पथक दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:22 IST2021-06-30T04:22:37+5:302021-06-30T04:22:37+5:30
लाेणार तालुक्यात रविवारी जिल्ह्यात सर्वाधिक पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले़ यामध्ये चाेरपांग्रा येथे ३६ जणांचा समावेश आहे़ त्यामुळे, आराेग्य विभागाने ...

चाेरपांग्रा येथे आराेग्य पथक दाखल
लाेणार तालुक्यात रविवारी जिल्ह्यात सर्वाधिक पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले़ यामध्ये चाेरपांग्रा येथे ३६ जणांचा समावेश आहे़ त्यामुळे, आराेग्य विभागाने २८ जूनला गावात भेट देउन अनेकांच्या चाचण्या केल्या़ गावातील सर्वांचीच काेराेना चाचणी करण्याची गरज आहे तसेच कंटेनमेंट झाेन तयार करून पाॅझिटिव्ह रुग्णांना क्वारंटाईन करण्याची गरज आहे़ गावातील ४६ जणांचा अहवाल अद्यापही आला नसल्याने पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे़ जिल्हा आराेग्य अधिकारी डॉ़ कांबळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ़ किसन राठोड, डाॅ़ जैन, डाॅ़ युम,डाॅ़ हरीश काळे, दीक्षा अवसरमाेर, नायब तहसीलदार पाटील, तलाठी पवार, ग्रामसेवक साैदर, सरपंच संजय चव्हाण, अंगणवाडीसेविका,तंटामुक्ती अध्यक्ष केशव डहाळके, पोलीस पाटील सुनीता आगलावे, ग्रामपंचायत शिपाई गजानन खंड , संजय इंगळे आदी उपस्थित हाेते़