शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

पोकरा, रोहयो कामांमध्ये दिरंगाई; ४६ कृषी सहाय्यकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 11:45 IST

Action taken against 46 agricultural assistants : १६ कृषी सहाय्यकांची वेतनवाढ कायमस्वरूपी रोखणे तसेच ३० जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : जिल्ह्यात पोकरा योजनेची अंमलबजावणी करणे तसेच रोजगार हमी योजनेतील कामांमध्ये दिरंगाई केल्याचा ठपका ठेवता जिल्ह्यातील १६ कृषी सहाय्यकांची वेतनवाढ कायमस्वरूपी रोखणे तसेच ३० जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.दरम्म्यान  प्रकार सूडबुद्धीने केल्याचा आरोप करत कृषी सहाय्यक, सेवकांनी आंदोलनाचे विविध टप्पे सुरू केले आहेत. त्यामध्ये ६ जुलैला काळ्या फिती लावून काम करण्यात आले. कृषी सहाय्यक संघटनेने बुलडाणा जिल्ह्यात कृषी सहाय्यक, सेवकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आंदोलन सुरू केले. त्याबाबतचे निवेदनही देण्यात आले. जिल्ह्यात पाेकरा, रोहयोची अंमलबजावणी करताना ती कामे पिछाडीवर असल्याचा ठपका कृषी सहाय्यकांवर ठेवण्यात आला.  त्याला जबाबदार धरून जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांची वेतनवाढ तात्पुरती तसेच कायमस्वरूपी रोखण्यात आली तर ३० जणांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात आली. त्यामध्ये समाधानकारक खुलासा नसल्यास पुढील कारवाई होणार आहे. या प्रकाराने जिल्ह्यातील कृषी सहाय्यक धास्तावले असून आता त्यांनी आंदोलनात्मक पवित्रा स्वीकारला आहे.

१२ जुलैपासून  लेखणी बंद जिल्ह्यातील कृषी सहायकांवर प्रस्तावित कारवाई मागे घेणे, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील विविध अडचणी सोडवा, क्रॉपसॅपअंतर्गत प्रलंबित अनुदान द्या, पोक्राअंतर्गत विविध अडचणी सोडवा, या मागण्या आहेत. n त्या पूर्ण न झाल्यास ६ व ७ जुलैला काळ्या फिती लावून काम करणे, ८ जुलैला जिल्ह्यातील सर्व कृषी सहायक अतिरिक्त पदभार सोडून देतील, विविध कार्यालयीन व्हॉटस्‌अप ग्रुपमधून बाहेर पडणे, ९ जुलैला ऑनलाईन ॲप्स वापरावर बहिष्कार टाकणे, १२ जुलैपासून ‘लेखणी बंद’ आंदोलन करणार आहेत.  

टॅग्स :khamgaonखामगाव