शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्याचे ९0 कोटी रुपये पडून

By admin | Updated: July 18, 2015 02:14 IST

पीकविम्याचे बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांना सुमारे ९१ कोटी रुपये मंजूर; मात्र अद्याप शेतक-यांना वाटप नाही.

बुलडाणा : राष्ट्रीय पीकविमा योजनेंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी मोठय़ा प्रमाणावर विमा काढला होता. या पीकविम्याचे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सुमारे ९१ कोटी रुपये मंजूर झाले आहेत; मात्र ही रक्कम अद्याप शेतकर्‍यांना मिळाली नाही. बँकेत पडून असलेली ही रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात वळती केल्यास दुबार पेरणीसाठी शेतकर्‍यांना हातभार लागू शकतो. यासंदर्भात येथील सुनील तायडे, कौतिक पाटील, गणेश रिंढे पंडित नप्ते, सुनील गवई, दिलीप जाधव यांच्यासह ४0 शेतकर्‍यांनी जिल्हा प्रशासनाकडे चौकशी केली असता, ९0 कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती देण्यात आली. जिल्ह्यात जवळपास ७0 टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. मागील २५ दिवसांपासून पावसाने उघाड दिल्याने शेतकर्‍यांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. एकीकडे अनेक शेतकरी अद्याप पीक कर्जापासून वंचित आहेत, तर दुसरीकडे दुबार पेरणीचे संकट आले आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी पीक विम्याची रक्कम मोलाचा हातभार लावू शेकते. या आर्थिक संकटाच्या वेळी शेतकर्‍यांना दिलासा मिळाला नाही तर शेतकर्‍यांची मानसिकता खराब होऊन ते आत्महत्या सारखा मार्ग अवलंबवितात. शेतकर्‍यांना पुन्हा एकादा नव्या उमेदीने आलेल्या संकटावर मात करण्यासाठी शेतकर्‍यांची पीक विम्याची रक्कम त्वरित त्यांच्या खात्यात जमा करावी. जेणे करून याच पैशातून शेतकरी पुन्हा बी-बियाणे खरेदी करून नव्याने पेरणी करू शकतो. तेव्हा शेतकर्‍यांच्या पीक विम्याची रक्कम त्वरित त्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.