अपहरण करून पाच लाखांची मागितली खंडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 15:25 IST2020-02-22T15:25:26+5:302020-02-22T15:25:35+5:30
अटक करण्यात आलेल्यांमध्ये श्रीकृष्ण भास्कर खानझोडे व राहूल देविदास माहापुरे यांचा समावेश आहे.

अपहरण करून पाच लाखांची मागितली खंडणी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमडापूर: एकाचे अपहरण करून त्यास एका खोलीत डांबून ठेवत पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अमडापूर पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. दरम्यान अटक करण्यात आलेल्यांमध्ये श्रीकृष्ण भास्कर खानझोडे व राहूल देविदास माहापुरे यांचा समावेश आहे.
अमडापूर येथे एका टिनशेडमध्ये हिवरा खुर्द येथील विलास अर्जूनराव शेळके (४२) यास अमडापूर येथील राहूल देविदास माहापुरे आमि बोरगाव काकडे येथील श्रीकृष्ण भास्कर खानझोडे व त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी डांबून ठेवले होते. सोबतच पाच लाखांची खंडणी त्यांना मागत होते. १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान विलास अर्जून राव शेळके यास डांबून ठेवल्या गेले होते. सोबतच या दरम्यान विलास शेळके यास मारहाण करून जखमीही करण्यात आले होते. मधल्या काळात त्याने कशीबसी सुटका करून अमडापूर पोलिस ठाणे गाठले होते. प्रकरणी श्रीकृष्ण भास्कर खानझोडे व राहूल देविदास माहापुरे विरोधात पोलिसात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. अन्य तिघे जण फरार झाले आहेत. नेमक्या कोणत्या कारणावरून विलास शेळके याचे अपहरण करून त्यास डांबून ठेवले होते ही बाब मात्र स्पष्ट होऊ शकली नाही. सोबतच त्यास खंडणी कोणत्या कारणावरून मागण्यात येत होती ही बाबबी सांगण्यास पोलिस टाळाटाळ करीत होते. (वार्ताहर)