पत्नीचा छळ, पती विरोधात गुन्हा

By अनिल गवई | Updated: April 5, 2024 16:47 IST2024-04-05T16:45:49+5:302024-04-05T16:47:57+5:30

पत्नीचा छळ केल्याप्रकरणी एका पती विरोधात न शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

a case has been registered under various sections against a husband for torturing his wife in buldhana | पत्नीचा छळ, पती विरोधात गुन्हा

पत्नीचा छळ, पती विरोधात गुन्हा

अनिल गवई, खामगाव : पत्नीचा छळ केल्याप्रकरणी एका पती विरोधात तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, मनिषा दीपक इंगळे (३७, रा. दाळफैल) या विवाहितेचा विवाह रावण टेकडी घरकुलातील दीपक इंगळे यांच्यासोबत झाला. लग्नानंतर सुरूवातीचे काही दिवस पतीने चांगले वागविले. मात्र, त्यानंतर मद्यपान करून त्याने मनिषाचा मानसिक व शारीरिक छळ केला. 

काही दिवस छळ सहन केल्यानंतरही पतीकडून या घटना थांबल्या नाहीत. या घटना २८ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२४ च्या कालावधीत मारहाण आणि शिवीगाळ करीत मानसिक छळ केल्याचे तक्रारीत म्हटले. या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी दीपक इंगळे याच्या विरोधात भादंवि कलम ४९८ अ, ३२३ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल संगीता आगरकर करीत आहेत.

Web Title: a case has been registered under various sections against a husband for torturing his wife in buldhana