शहरं
Join us  
Trending Stories
1
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
2
CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट
3
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
4
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
5
Latest Marathi News LIVE Updates: "धारावीकरांना हुसकावून लावण्यासाठी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त...", काँग्रेस खासदारांचा गंभीर आरोप
6
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
7
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
8
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
9
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
10
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
11
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
12
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
13
Vastu Shastra: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग एकदा भिंतीवरची चित्र बदलून पाहाच!
14
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
15
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
16
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
17
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
18
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
20
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदी केंद्रावर ९५०० क्विंटल तूर बाकी

By admin | Updated: April 30, 2017 19:34 IST

लोणार- तूर खरेदी रखडल्यामुळे शेतकºयांना एक एक दिवस मोजावा लागत असून, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अजुनही ९५00 क्विंटल तूर मोजमापाच्या प्रतिक्षेत आहे.

लोणार : २२ एप्रिल  पर्यंत बाजार समितीच्या आवारामध्ये असणाऱ्या वाहनांची तूर खरेदी करण्याची तयारी शासनाने दाखवली आहे. परंतु या बाबत अद्याप निर्देश आलेले नसल्यामुळे खरेदी प्रक्रिया नव्याने केव्हा सुरू होणार या बाबत शेतक?्यांना उत्सूकता आहे. गेल्या दोन महिन्यांपासून खरेदी रखडल्याने शेतकऱ्यांना एकेक दिवस मोजावा लागत आहे. दरम्यान लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये मोजमाप न झालेली  ९५०० क्विंटल तूर आहे.  २२ एप्रिल रोजी शासकीय तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आलेले आहेत. लोणार येथील भारतीय खाद्य निगम चे तूर खरेदी केंद्र व  कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडे तूर केव्हापासून पुन्हा खरेदी करायची याविषयी निर्देश नाहीत. त्यामुळे खरेदी केव्हा सुरु होणार हे कोणीही सांगायला तयार नाही. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. तुरीचे माप लवकर होत नाही ही काळजीआणि डोक्यावर रणरणते उन असा मार त्यांना सहन करावा लागत आहे. वाहन आणि रोजचा खर्च वेगळा. शेतकऱ्यांना तुरीचे पैसे मोकळे झाले की खरीपाची तयारी करायची आहे. बाजारातून बियाणे खरेदीसाठी त्यांना पैशाची गरज आहे आणि खुल्या बाजारामध्ये तूर विकल्यास हजार रुपयांचे नुकसान होत असल्यामुळे तूर उत्पादक कैचीत सापडला आहे.शासकीय तूर खरेदी केंद्र जानेवारी मध्ये सुरु झाले होते . त्यावेळेस खाजगी व्यापा?्यांनी तूरीचे भाव ३८००  रुपये  वरून ४२००  रुपये पर्यंत वाढ केली होती.परंतु शासकीय तूर खरेदी केंद्र बारदाण्या अभावी सतत बंद राहत असल्याचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी तूरीचे भाव पुन्हा  ३५०० ते ३८०० रुपयांवर आणून ठेवला आहे .यामुळे लग्नसराईत कैचीत सापडलेल्या अनेक शेतकऱ्यांना पैशासाठी कमी भावात तूर विकावी लागलेली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी ३५०० -३८०० रुपये प्रमाणे तुरीची खरेदी करत आहेत. शासकीय तूर खरेदी  दराचा विचार करता हजार रुपयांचा फरक आहे. ज्यांना पैसा मोकळा करायचा आहे ते शेतकरी व्यापाऱ्यांना माल देत आहेत. परंतु बहुतांश शेतकरी शासकीय तूर खरेदीची वाट पाहत आहेत.यामुळे २२ एप्रिल पर्यंत बाजार समितीच्या आवारामध्ये असणाऱ्या वाहनांची तूर खरेदी करण्याची तयारी शासनाने दाखवली आहे.त्यानुषंगाने २७ एप्रिल रोजी लोणार कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये असलेल्या तूरीचा पंचनामा करून त्याबाबतचा अहवाल सनियंत्रण समिती अध्यक्ष उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश अपार यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे सादर केला आहे.यावेळी कृउबा समिती सभापती शिवपाटील तेजनकर, तहसिलदार सुरेश कव्हळे , संजय भोईटे, मार्केटिंग फेडरेशन सदस्य, लोणार खरेदी-विक्री संघ सदस्य,सचिव वायाळ, कृ.ऊ.बा. संचालक उपस्थित होते.