शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात ७० टक्के उद्योगक्षेत्र रुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 11:58 IST

Industry in Buldhana District ३५० उद्योगांपैकी २४५ उद्योग कार्यान्वीत झाले आहे.

बुलडाणा : कोरोना संकटामुळे जिल्ह्यातील अैाद्योगिक क्षेत्र पाच वर्षांनी मागे पडले असले तरी वर्तमान स्थितीत ३५० उद्योगांपैकी २४५ उद्योग कार्यान्वीत झाले आहे. मधल्या काळात अत्यावश्यक सेवेत येणारे अर्थात फुड इंडस्ट्रीशी संबंधीत असलेले खामगाव येथील उद्योग वगळता अन्य उद्योग जवळपास बंद होते.मात्र आता जिल्ह्यात ७० टक्के उद्योग सुरू झाले असून जवळपास चार हजारांपेक्षा अधिक कामगारांच्या हाताला काम मिळाले आहे. तरीही चिखली अैाद्योगिक वसाहतीतंर्गत कामगारांची समस्या कायम आहे. बुलडाणा जिल्ह्यात एकूण ४८२ उद्योग असले तरी त्यापैकी ११५ उद्योग पुर्वीपासूनच बंद आहेत तर अन्य काही उद्योग डबघाईस आले आहेत. अशा  स्थितीत लॉकडाऊन पूर्वी जिल्ह्यात ३५० उद्योग सुरू होते. मात्र  मार्चमध्ये लाॅकडाऊन सुरू झाल्यानंतर खामगावातील कृषी उद्योग व फुड इंडस्ट्रीजशी संबंधीत उद्योग सुरू होते. २० एप्रिल नंतर खऱ्या अर्थाने ते सुरू झाले. या कालावधीत जिल्ह्यात ९७ उद्योग सुरू होते. त्यात १,१२५ कामगार कार्यरत होते. त्यानंतर टप्प्या टप्प्याने उद्योग जिल्ह्यात सुरू झाले. या प्रामुख्याने दालमील, तेल उत्पादन, जिनिंग उद्योगांचा समावेश होता. मात्र मलकापूर येथे असलेल्या रसायन उद्योग, पेपर मिल, बोर्ड उद्योग, ऑईल मिल व्यवसायाला फटका बसला आहे.  जिल्ह्यात नऊ अैाद्योगिक वसाहती आहेत. मात्र मलकापूर, खामगाव व काही प्रमाणात चिखली येथेच खऱ्या अर्थाने उद्योग एकवटलेले आहे.

कामगारांची समस्या कायम आहे. पण स्थिती पूर्वपदावर येतेय. २५ टक्के उद्योग सुरू झाले असून २० टक्क्यांच्या आसपास कामगार आले येथे आले आहेत.- अशोक अग्रवाल, उद्योजक, चिखली.

खाद्य उद्योग व अत्यावश्यक सेवेत येथील उद्योग अधिक आहेत. त्यामुळे लॉकडाऊन काळात येथे उद्योग सुरू होते. मात्र उद्योगाल फटका बसला.- मोहनलाल तावरी, उद्योजक, खामगाव

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक