६४ वर्षीय वृद्धाने केला बालिकेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 19:37 IST2020-11-22T19:36:57+5:302020-11-22T19:37:18+5:30
बालिका घरासमोर खेळत असताना तिला उचलून गाडीत तिचा विनयभंग केला.

६४ वर्षीय वृद्धाने केला बालिकेचा विनयभंग
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : शहरातील एका भागात रविवारी दुपारी दोन वाजेदरम्यान चौसष्ठ वर्षीय वयोवृद्धाने बालिकेचा विनयभंग करून मारहाण केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.
शहरातील ज्ञानगंगा नदीच्या तीरावर असलेल्या एका भागातील आरोपी भगवान शंकर डिवरे याने हा किळसवाणा प्रकार केला. तीन वर्षीय पीडित बालिका घरासमोर खेळत असताना तिला उचलून गाडीत तिचा विनयभंग केला. दरम्यान तिची आई वाचविण्यासाठी आली. त्यावेळी दोघींनाही धक्का देऊन शिवीगाळ करत पळ काढला. या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी आरोपीला अटक केली. पीडित बालिकेच्या आईच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.