शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

६४ प्रकरणे प्रलंबित

By admin | Updated: February 28, 2015 01:06 IST

सिंदखेडराजा येथील भूमिअभिलेख कार्यालयास रिक्त पदांचे ग्रहण.

सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) : येथील भूमिअभिलेख कार्यालयात ७ पदे रिक्त असून, नागरिकांची अनेक कामे खोळंबली आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील भूमिअभिलेख कार्यालयामध्ये जानेवारी २0१५ पासून सुमारे ६४ प्रकरणे प्रलंबीत आहेत. तालुक्यामध्ये ११४ गावे असून, या गावांचा कारभार येथील भूमिअभिलेख कार्यालयावर आहे. या भूमिअभिलेख कार्यालयांतर्गत शेतीची मोजणी, जागेची मोजणी, क्षेत्रफळ निश्‍चीत करणे आदी प्रकारचे कामे केली जातात. ही सर्व कामे सध्या ई मोजणी अज्ञावली कार्यप्रणालीप्रमाणे सुरु आहे. यामुळे अर्जदारांना योजनेची तारीख व मोजणीदाराचे नाव याची पोच त्वरीत मिळते. परंतु येथील भूमि अभिलेख कार्यालयात कर्मचारी कमी असल्यामुळे अनेक शेतकर्‍यांची कामे खोळंबली आहेत. या कार्यालयात १३ पदे मंजूर आहेत. परंतु उपअभिक्षकासह ७ पदे रिक्त आहेत. त्यामध्ये उ पअधिक्षकाचे एक पद, सिरस्तेदार, परिनिरिक्षक भुमापक आदींची पदे रिक्त आहेत. तर अभिलेखापालपदी असलेल्या एका कर्मचार्‍याला नांदुरा येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे. त्यामुळे सध्या भुमापक २, दुरुस्ती लिपीक १, छानणी लिपीक १, कनिष्ठ लिपीक १ व प्रतिलिपीक १ अशा ६ कर्मचार्‍यांवर तालुक्याचा कारभार आहे. या रिक्त पदांमुळे जवळपास ६४ प्रकरणे प्रलंबीत आहेत. येथे कार्यरत कर्मचार्‍यांसुद्धा कामाचा अतिरिक्त भार आहे. सिंदखेडराजा, देऊळगावराजा व लोणार तालुक्याचा अतिरिक्त पदभार उपअधिक्षक एस.एस.कडू हेच सांभाळतात. कार्यालयाला रिक्त पदांचे ग्रहण लागल्याने नागरिकांना विविध कामासाठी या कार्यालयाच्या पायर्‍या झिजवाव्या लागत आहेत. यासंदर्भात भूमि अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक एस.एस.कडू यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भूमिअभिलेख कार्यालयातील रिक््त पदाची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना वेळोवेळी देण्यात आली असल्याचे सांगीतले. मार्च २0१५ पासून ई फेरफार योजना अंमलात येणार आहे. त्यामुळे अधिक सोयीचे होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.