प्रेम प्रकरणातून २२ वर्षीय युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 16:37 IST2020-08-08T16:37:21+5:302020-08-08T16:37:31+5:30
२२ वर्षीय युवकाने राहत्या घरी विष प्राषण करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.

प्रेम प्रकरणातून २२ वर्षीय युवकाची आत्महत्या
मलकापूरः मोताळा तालुक्यातील मौजे पिंपरी गवळी येथील २२ वर्षीय युवकाने राहत्या घरी विष प्राषण करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. आज येथील उपजिल्हा रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आल्याने हि घटना उघडकीस आली आहे. यासंदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ,संजय सोपान सुरळकर वय २२ रा.पिंपरी गवळी ता.मोताळा असे मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री त्याने प्रेम प्रकरणातून विष प्राषण केले. अस पोलिसांनी सांगितले .त्याला उशिरा रात्री मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या आधी त्याची प्राणज्योत मालवली होती. प्रेम प्रकरणात त्या युवकावर गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे.पण सामान्य कुटुंबातील युवकाने आत्महत्या केल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.