खामगावातील फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणासाठी २०० अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 12:19 PM2020-07-29T12:19:24+5:302020-07-29T12:19:38+5:30

या योजनेला जुलैच्या १५ दिवसांच्या आतच तब्बल १३० फेरीवाल्यांनी सर्वेक्षणासाठी आॅनलाइन अर्ज केले आहेत.

200 applications for survey of peddlers in Khamgaon! | खामगावातील फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणासाठी २०० अर्ज!

खामगावातील फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणासाठी २०० अर्ज!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : गत वर्षभरापासून रखडलेल्या पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेला खामागव शहरात आता अचानक गती प्राप्त होत आहे. अल्प प्रतिसादामुळे ०१ जून-१९ ते १३ जुलै २०२० या कालावधीत रखडलेल्या योजनेने आता कमालिची गती घेतली आहे. वर्षभरात केवळ ७० जणांनी प्रतिसाद दिलेल्या या योजनेला जुलैच्या १५ दिवसांच्या आतच तब्बल १३० फेरीवाल्यांनी सर्वेक्षणासाठी आॅनलाइन अर्ज केले आहेत.
केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएमएसव्हीए निधी) पथ विक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेची नगरपरिषद खामगाव दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान शहर अभियान व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला आहे. अशा व्यवसायिकांना व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी एक वर्षाच्या परतफेड मुदतीसह रुपये दहा हजार पर्यंतचे खेळते भांडवल बँकेतून तारण न घेता कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. कर्ज नियमित परतफेड केल्यास त्यांना ७ टक्के व्याज अनुदान प्राप्त होईल.
खामगाव शहरामध्ये व्यवसाय करित असलेले पथविक्रेते, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात आढळलेले परंतु ओळखपत्र, विक्रीप्रमाणपत्र दिले गेले नाही. असे पथविक्रेते, ज्यांनी सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर विक्री सुरू केले आहे. शहरी क्षेत्रामध्ये पथविक्री करणाऱ्या नगर परिषदेने पत्र जारी केले आहे. अशा सर्व पात्र पथविक्रेत्यांना लागू असेल.
योजनेचा लाभ शहरातील सर्व पथविक्रेत्यांनी घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी केले आहे. माहितीसाठी नगर परिषद खामगाव येथे संपर्क साधण्याचे आवाहन शहर अभियान व्यवस्थापक राजेश झनके यांनी केले आहे.


आवश्यक असणारी कागदपत्रे
पथविक्रेत्यांचे आधार कार्ड मोबाइल क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे. पथविक्रेत्यांनी वेबसाईटवर जाऊन अर्ज करावे. किंवा सीएलएफ, चीएलसी, सीएससी केंद्राद्वारे आधार कार्ड, आधार कार्ड संलग्न मोबाइल क्रमांक, मतदानकार्ड, ड्राइव्हिंग लायसेन्स (असल्यास), रेशन कार्ड, टी.सी., पॅन कार्ड, आधार लिंक बॅक पासबुक, पासपोर्ट साइज फोटो, इत्यादि आवश्यक कागदपत्रासहीत सीएफएफ, सीएलसी, सीएससी केंद्राद्वारे आॅनलाइन अर्ज सादर करावे.

सर्वेक्षणासाठी आॅनलाइन अर्ज
खामगाव शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुलभ करण्यासाठी आॅनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरातील फेरीवाल्यांनी तात्काळ सर्वेक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: 200 applications for survey of peddlers in Khamgaon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.